दिवसेंदिवस चोरीच्या घटनेत वाढ होत आहे

कजगाव ता भडगाव येथे चोरट्यांचा सपाटा सुरूच असून दिवसेंदिवस चोरीच्या घटनेत वाढ होत चालली आहे दोन दिवसांपूर्वी गावातील शेतकऱ्याच्या शेतातील अडीच लाखाची ताडपत्री चोरी झाल्याची घटना ताजी असतांना आता कजगावचे माजी सरपंच निवृत्ती पूना पवार यांच्या गोंडगाव रस्त्यावरील शेतातील कालिका माता मंदिरात चोरी झाल्याची घटना घडली आहे पाहिले महादेव मंदिर दुसरे ऋषीबाबा मंदिर व आता शेतातील कालिका माता मंदिरात चोरट्यानी हात साफ केला आहे निवृत्ती पवार यांच्या शेतातील कालिका माता मंदिरातून पाच किलो वजनाचा पितळी घंटा व मंदिरातील दानपेटी फोडून भामट्यांनी पोबारा केला आहे वारंवार घडणाऱ्या चोरीच्या घटनेमुळे गावात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे शेत शिवारातील व मंदिरातील वाढत्या चोऱ्या पाहता ग्रामस्थांनी चिंता व्यक्त केली आहे त्यामुळे पोलिसांनी ह्या वाढत्या चोरीच्या घटनेकडे गांभियाने पाहत भामट्यांना जेरबंद करावे अशी मागणी होत आहे

बातमी शेअर करा...
बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम