दिव्यांगांची सेवा हीच खरी ईश्वरसेवा – पालकमंत्री गुलाबराव पाटील

बातमी शेअर करा...

दिव्यांगांची सेवा हीच खरी ईश्वरसेवा – पालकमंत्री गुलाबराव पाटील

▪️ धरणगाव येथे दिव्यांग सक्षमीकरण कार्यक्रमात भावनिक प्रतिपादन

जळगाव
“दिव्यांग बांधवांना केवळ आर्थिक मदत नव्हे, तर आत्मसन्मान देणे हीच खरी सामाजिक जबाबदारी आहे. त्यामुळे संजय गांधी निराधार योजनेतील मदत १००० रुपयांवरून वाढवून दरमहा २५०० रुपये करण्यात आली आहे. तसेच जिल्हा वार्षिक नियोजन (डीपीडीसी) अंतर्गत एक टक्के निधी दिव्यांग सक्षमीकरणासाठी राखीव ठेवण्यात आला असून, ही रक्कम तब्बल ७ कोटींहून अधिक आहे,” असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

धरणगाव येथे आयोजित दिव्यांग सक्षमीकरण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी १२ दिव्यांग बांधवांना बॅटरीवर चालणाऱ्या तीनचाकी सायकली, २०० पेक्षा अधिक दिव्यांग महिलांना साड्यांचे वाटप, तसेच ५० लाभार्थ्यांना रेशनकार्डचे वितरण केले.

याप्रसंगी अपंग महासंघातर्फे तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी, मुख्याधिकारी रामविलास झवर, गटविकास अधिकारी किशोर वानखेडे यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. दिव्यांग निधीचे नियोजनपूर्वक वितरण करून दिव्यांगांना दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज पाटील सर यांनी केले. अपंग महासंघाचे तालुकाध्यक्ष संजय पाटील यांनी प्रास्ताविक केले. आभार प्रदर्शन शहराध्यक्ष रवींद्र काबरा यांनी केले.

कार्यक्रमाला शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी, मुख्याधिकारी रामनिवास झवर, गटविकास अधिकारी किशोर वानखेडे, तालुका प्रमुख डी. ओ. पाटील, पोलीस निरीक्षक संतोष पवार, तसेच अपंग महासंघाचे पदाधिकारी व शिवसेना कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम