दुचाकी अपघातात तरूण गंभीर

बातमी शेअर करा...

दुचाकी अपघातात तरूण गंभीर

जळगावः शहरातील रेल्वे कॉटर समोरील बौद्ध विहार येथून भरधाव दुचाकीच्या अपघातात तरूणाच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याची घटना शनिवारी ३१ मे रोजी रात्री १०.३० वाजता घडली आहे. या संदर्भात जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दर्शन विकास पाटील (वयः२२, रा. राजाराम नगर, जळगाव) हा तरुण आपल्या कुटुंबीयासह वास्तव्याला आहे. शनिवारी ३१ मे रोजी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास रेल्वे कॉटर समोरील बौद्ध विहार येथून दुर्गेश जगदीश भोई (रा. चंदू अण्णा नगर जळगाव) यांच्या दुचाकी क्रमांक (एमएच १९ सीएल १३४५) ने मागे बसून दर्शन पाटील हा जात होता. त्यावेळी अचानक दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात दर्शन पाटील याच्या पायाला दुखापत झाली. अपघात घडल्यानंतर त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. उपचार घेतल्यानंतर रविवारी १ जून रोजी दुपारी १२ वाजता दुचाकीस्वार दुर्गेश भोई यांच्या विरोधात जळगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल वीरेंद्र शिंदे करीत आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम