देशाच्या स्वातंत्र्य युद्धात टिळकांचे योगदान मोलाच –  पवनमहाराज शर्मा माजी नगरसेवक

बातमी शेअर करा...
देशाच्या स्वातंत्र्य युद्धात टिळकांचे योगदान मोलाच –  पवनमहाराज शर्मा माजी नगरसेवक
     
शेगाल /प्रतीनीधी इंग्रजांच्या राजवटी विरुद्ध त्या काळात कोणीही बोलायला तयार नसताना लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी लहानपणापासूनच इंग्रजांविरुद्ध स्वतःच्या मना मध्ये चीड निर्माण करून ती सर्वसामान्यांच्या मनात सुद्धा निर्माण करून दिली
त्यामुळे इंग्रजांविरुद्ध संघटित लढा लोकमान्य टिळकांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी लढला या असंतोषाचे जनक ,प्रखर राष्ट्रवादी व “स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे ” हे इंग्रजांना ठणकावून सांगणारे लोकमान्य टिळक यांची देशातील प्रत्येक नागरिकांनी आठवण ठेवून त्यांच्या विचारांवर देशाचे वर्तमान व भविष्य ठरवले पाहिजे असे पवनमहराज शर्मा यांनी म्हटले आहे .
आज दिनांक 23 जुलै  2025 बाळ गंगाधर लोकमान्य टिळक यांच्या जयंतीनिमित्त संतनगरी शेगाव येथे लोकमान्य टिळक चौक येथे आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी त्यांनी हे सांगितले की लवकरच या लोकमान्य टिळक चौकात लोकमान्य टिळकांचे स्मारक मंजूर झाले आहे व एक सुंदर स्मारक या ठिकाणी पुढच्या जयंतीनिमित्त उभारलेले असेल
   यावेळेस माजी नगराध्यक्ष
             शरदशेठ अग्रवाल प्रदीप सांगळे नंदूभाऊ कुलकर्णी  सचिन ढमाळ विजय जगधन ज्ञानेश्वर साखरे कैलास देशमुख अनिल उंबरकर राजूभाऊ व्यास दीपक शर्मा राजू भिसे पंकज देशपांडे  पंकज भिवटे   अंजली जोशी अजय राजवैद्य ,संजय त्रिवेदि क्रुष्णाली देशपांडे रुद्र देशपांडे रवी थोडगे दत्ता भोंडेकर राजु शितुत गोपाल शर्मा तसेच भारतीय जनता पक्ष भारतीय जनता पक्ष महिला आघाडी युवा मोर्चा अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस , शेगाव पत्रकार संघ यांच्या वतीने अभिवादन करण्यात आले  तसेच राष्ट्रभक्त नागरिकांनी टिळकांच्या प्रतिमेला अभिवादन केले
बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम