
दोन वर्षांसाठी हद्दपार केलेला संशयित जेरबंद
जळगाव: दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेल्या नितीन किसन कुंभार (वय २५, रा. मयूर कॉलनी, पिंप्राळा) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने ताब्यात घेतले आहे. हा आरोपी पोलिसांच्या परवानगीशिवाय शहरात परत आल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नितीन कुंभार याला १८ मार्च २०२४ रोजी दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले होते. तरीही तो आदेशाचे उल्लंघन करून शहरात परत आल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानुसार, २३ ऑगस्ट रोजी पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली.
याप्रकरणी पोलीस कर्मचारी रवींद्र कापडणे यांच्या फिर्यादीनुसार, तालुका पोलीस ठाण्यात आरोपी नितीन कुंभार विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार रामकृष्ण इंगळे करत आहेत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम