जळगांव शहरातील सर्व धार्मिक स्थळावरील अवैध भोंगे व धंदे बंद करण्याची मनसेची मागणी

अन्यथा मनसेचे त्या धार्मिक स्थळी हनुमान चालीसा पठण, मनसेचा ईशारा

बातमी शेअर करा...

 

बातमीदार | दि ५ जानेवारी २०२४

जळगांव शहरातील सर्व धार्मिक स्थळावरील अवैध भोंगे व अवैध धंदे धंदे बंद करण्याची मनसेची मागणी

जळगांव शहरातील सर्व धार्मिक स्थळावर अनधिकृतपणे विना परवानगी मोठ्या प्रमाणात अवैध भोंगे अवैध धंदे सुरू आहेत. सदर भोंगे व अवैध धंदे त्वरित बंद करावेत असे निवेदन मुख्यमंत्री, गृहमंत्री, जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना मनसे तर्फे देण्यात आले आहे.

अवैध भोंग्यांचा सकाळी ५.०० वाजेपासून ते रात्रीपर्यंत हा मोठ्या प्रमाणात कर्कश असा आवाज सुरु असतो.

त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर होत आहे. तसेच सुप्रिम कोर्टाच्या आदेशानुसार भोंग्याचा आवाज हा ५० डेसीबील च्या आत असायला हवा परंतु शहरामध्ये सुप्रिम कोर्टाच्या आदेशाचे उघड उघड उल्लंघन करण्याचे निदर्शनास येत आहे.

शहरात भोंग्याच्या आवाजाची कशी पैजच लागलेली असते. आमच्या भोंग्याचा आवाज मोठा की तुमच्या यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

तरी सदरील धार्मिक स्थळावरील अनधिकृत भोंग्याचा आवाज ५ दिवसांचे आत बंद न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना ज्या-ज्या ठिकाणी भोंग्याचा आवाज सुरु असेल त्याठिकाणी हनुमान चालीसा वाजविणार याची दखल घ्यावी. यामुळे कायदा व सुव्यवस्था बिघडल्यास त्याला सर्वस्वी जबाबदार प्रशासन राहील असा ईशारा दिला आहे.

जळगांव शहरात मोठ्या प्रमाणावर ठिकठिकाणी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे, सट्टा, पत्ता, गावठी दारु ई. ना ऊत आला आहे. याचा परिणाम तरुण पिढीवर मोठ्या प्रमाणावर होत असुन तरुण व्यसनाच्या आहारी जाऊन तरुणवर्ग गुन्हेगारी मार्गाकडे वळत आहेत.

हा ही व्हिडिओ पाहा 👇

तसेच शहराच्या मध्यवर्ती ठिकाणावर तसेच कॉलनी मध्ये मोठ्या प्रमाणावर ऑटो रिक्क्षा मध्ये घरगुती गॅसचा वापर करुन सर्रासपणे तो भरुन दिला जात आहे. त्यामुळे एखाद्या वेळेस मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

जळगांव शहरातील सर्व ट्रैफिक सिग्नल हे बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे शहरात वाहतुकीला शिस्तच राहिलेले नाही. यामुळे शहरात अनेक वेळा छोटे-मोठे अपघात होत असतात.

तसेच विशेष करुन विद्यार्थ्यांच्या शाळा भरण्याच्या वेळेस व सुटण्याच्या वेळेस वाहतूकीची कोंडी होत असते. बंद अवस्थेत असलेल्या सिंगलमुळे विद्यार्थ्यांना तसेच विशेष करुन जेष्ठ नागरिकांना अनेक समस्यांचा त्रास सहन करावा लागत आहे.

या निवेदनाद्वारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे विनंती करण्यात आली आहे की, शहरातील धार्मिक स्थळावरील अनधिकृत भोंगे तसेच वरील सर्व समस्या या तात्काळ सोडविण्यात याव्यात.

सदरील समस्या तात्काळ सोडविण्यात आल्या नाहीत तर ज्या-ज्या ठिकाणी अनधिकृत रित्या अवैध धंदे दिसतील त्या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची टिम जाऊन संबंधित अवैध धंदे बंद पाडले जातील.

सदर निवेदनावर मनसेचे महानगराध्यक्ष विनोद शंकर शिंदे, उपमहानगर अध्यक्ष आशिष सपकाळे, जिल्हा संघटक जनहित राजेंद्र एस. निकम, शहर संघटक, जनहित श्रीकृष्ण मेंगळे यांची स्वाक्षरी आहेत.

हे ही वाचा 👇

सुंदरकांड पठणास भाविकांनी उपस्थिती द्यावी – डॉ अश्विनभाऊ सोनवणे

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम