
धुम स्टाईलने महिलेच्या गळ्यातून मंगळसूत्र लांबविले
जळगाव शहरातील दादावाडी परिसरातील घटना
धुम स्टाईलने महिलेच्या गळ्यातून मंगळसूत्र लांबविले
जळगाव शहरातील दादावाडी परिसरातील घटना
जळगाव : घरासमोरील किराणा दुकानासमोर उभ्या असलेल्या सिमा उर्फ नम्रता संदीप पाटील (वय ४२, रा. दादावाडी) या महिलेच्या गळ्यातून दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यांनी २ तोळ्याचे मंगळसूत्र जबरीने चोरुन चोरटे महामार्गाच्या दिशेने पळून गेले. ही घटना दि. २ रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास दादावाडीतील चाळीस खोल्या परिसरात घडली. याप्रकरणी तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील दादावाडी परिसरातील चाळीस खोल्या परिसरात सीमा उर्फ
दोन दिवसात तीन जबरी चोरीच्या घटना
गुरुवारी सकाळच्या सुमारास मॉर्निंग वॉक करणाऱ्या दोन महिलांच्या गळ्यातून चोरट्यांनी २५ मिनिटाच्या कालावधीत दोन सोनसाळखी चोरी केल्या होत्या. या घटना सीसीटीव्हीत कैद झाल्या असून त्यामध्ये देखील दोन चोरटे दिसून येत आहे. आता दादावाडीमध्ये झालेल्या घटनेत देखील दोन चोरट्यांचा समावेश आहे. त्यांचे वर्णन देखील एक सारखेच असल्याने ते चोरटे एकच असल्याचा पोलिसांना संशय आहे.
नम्रता पाटील या महिला वास्तव्यास आहे. दि. २ रोजी सायंकाळी त्या घरासमोरील किराणा दुकानासमोर रस्त्यावर उभ्या होत्या. यावेळी आनंद
कॉलनीकडून दुचाकीवरुन दोन इसम त्यांच्या दिशेने आले. त्या दुचाकीवरील मागे बसलेल्या इसमाने दुचाकी किराणा
दकानाजवळ थांबवली. त्या दुचाकीवर मागे बसलेला इसम खाली उतरला आणि त्याने दुकानात असलेल्या आशाबाई भोळे यांना सिगारेट आहे का अशी विचारणा केली. त्यांनी नाही सांगितल्यानंतर तो दुचाकीस्वार दुचाकीवर बसून जात असतांना त्याने सीमा पाटील यांच्या गळ्यातील ६० हजार रुपये किंमतीचे २ तोळे वजनाचे मंगळसूत्र जबरीने ओढले.
चोरटे महामार्गाच्या दिशेने पसार चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातून मंगळसूत्र ओढल्यानंतर महिलेने त्याला विरोध करीत धक्का दिला. मात्र चोरटे तेथून दुचाकीने महामार्गाच्या दिशेने पसार झाले. दरम्यान, सीमा उर्फ नम्रता पाटील यांनी तालुका पोलिसात तक्रार दिली असून त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम