यश – प्रभाग दोनमध्ये विविध कामांना सुरुवात ; माजी नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांच्या प्रयत्नांना यश

गोडाऊनपर्यंत गटारी रोड क्रॉसिंग कळवट तसेच उपनाला नवीन बांधकाम

बातमी शेअर करा...

बातमीदार l गुरुवार दि. २९ फेब्रुवारी २०२४

जळगाव ;- प्रभाग क्रमांक दोनमध्ये माजी नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी मनपाकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे गटारी ,उपनालाचे नावीन बांधकाम यासह अन्य कामांना आजपासून सुरुवात झाली असून परिसरातील रहिवाशांची समाधान व्यक्त केले आहे.

 नवनाथ दारकुंडे

 

 

प्रभाग क्रमांक दोन मधील शकील बागवान यांच्या घरापासून ते महाराष्ट्र दाल मिल च्या कोपऱ्यापर्यंत तसेच मकरा अपरमेंट याच्या पाठीमागील भागातील गोविंदा ओझा यांच्या गोडाऊनपर्यंत गटारी रोड क्रॉसिंग कळवट तसेच उपनाला नवीन बांधकाम करण्यासाठी तेथील रहिवासी नागरिकांनी वेळोवेळी नवनाथ दारकुंडे यांच्याकडे पाठपुरावा करून वरील कामाच्या संदर्भात तक्रारी केल्या होत्या. त्यानुसार नवनाथ दारकुंडे यांनी महापालिकेमध्ये पाठपुरावा करून महापालिका निधीमधून कामे मंजूर केलेली असून त्यांना आजपासून सुरुवात झाली आहे. नवनाथ दारकुंडे

बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी स्वतः नवनाथ दारकुंडे यांनी पाहणी करून मक्तेदाराला योग्य त्या सूचना करून हि कामे त्वरित आणि दर्जेदार करण्याचे नवनाथ दारकुंडे यांनी बोलताना सांगितले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम