नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातून देशाला नवी दिशा मिळणार – प्रा. तळेले

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण

बातमी शेअर करा...

             नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातून देशाला

           नवीदिशा मिळणार – प्रा. तळेले

        चोपडा – शिक्षणाचे बदलते स्वरूप आणि समाजात शिक्षण घेण्याची विद्यार्थ्यांची मानसिक स्थिती नेमकी काय असेल कारण विद्यार्थ्यांच्या मनात नवीन शैक्षणिक धोरणाबाबत अनेक प्रश्न आहेत.

पूर्वी परंपरागत शिक्षण पद्धतीत शालेय व उच्च शिक्षण पद्धती शाखेनुसार बदलत होती. आता शासनाने व्यावसायिक शिक्षणाची जोड देऊन या माध्यमातून नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील व कलागुणांना वाव मिळेल.

नव्या शैक्षणिक धोरणात एकाच वेळी  विद्यार्थ्यांना आपल्या आवडीचे विषय निवडता येतील आणि त्यात आपले करिअर घडवता येईल.

त्यामुळे नवीन शैक्षणिक धोरण हे देशाला दिशादर्शक ठरेल, असा विश्वास प्रा. एच. आर. तळेले यांनी व्यक्त केला.

चोपडा येथील भगिनी मंडळ संचलित कला व वाणिज्य महाविद्यालय तसेच कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने कला व वाणिज्य महाविद्यालय चोपडा येथे एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी प्रा. तळेले यांनी नवीन शैक्षणिक धोरणावर पीपीटीच्या माध्यमातून विद्यार्थी व शिक्षकांशी संवाद साधला. याप्रसंगी व्यासपीठावर संस्थेच्या अध्यक्षा सौ पुनम गुजराथी,

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ईश्वर सौंदाणकर, उपप्राचार्य डॉ. आशिष गुजराथी, कला व वाणिज्य महाविद्यालय प्रमुख डॉ. संजय चौधरी, महिला मंडळ माध्यमिक व

उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. डी. चौधरी, स्कूल ऑफ नर्सिंगचे प्राचार्य पिंजारी,  चित्रकला महाविद्यालयाचे प्राचार्य सुनील बारी, आयटीआयचे प्रमुख उदय ब्रम्हे, मुख्याध्यापक अरुणभाई संदानशिव उपस्थित होते.

कार्यशाळेत प्रा. तळले यांनी प्रतिपादन केले की, पुढील काळात शिक्षण हे क्रेडिट बेस्ड सिस्टीमनुसार असेल. यापुढे सर्टिफिकेट, डिप्लोमा, डिग्री, आणि मास्टर डिग्री व त्यानंतर पी.एच.डी. असा उच्चशिक्षणाचा प्रवास राहील.

नवीन शैक्षणिक धोरणातील टप्पे प्रा. तळेले यांनी समजावून सांगितले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. ईश्वर सौंदाणकर यांनी केले. सूत्रसंचालन गोपाल बडगुजर यांनी केले. आभार सौ भाग्यश्री महाजन यांनी मानले.

हे वाचा👇

अनेर परीसरात ५ कोटी ६६ लाखाच्या कामांचे थाटात आ. सौ. लताताई सोनवणे यांच्या हस्ते भुमिपुजन

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम