
नाईट क्रिकेट टर्फ स्पर्धेत ‘पाचोरा इनोव्हेटर्स’चा जलवा; नयन सूर्यवंशी सामनावीर
नाईट क्रिकेट टर्फ स्पर्धेत ‘पाचोरा इनोव्हेटर्स’चा जलवा; नयन सूर्यवंशी सामनावीर
पाचोरा प्रतिनिधी
भडगाव येथील रॉयल ग्रुप यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय नाईट क्रिकेट टर्फ टुर्नामेंटला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. जिल्ह्यातील बारा नामांकित क्रिकेट संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. रंगतदार आणि चुरशीच्या अंतिम सामन्यात पाचोरा इनोव्हेटर्स संघाने ‘देशमुख रायडर्स पाचोरा’ संघावर ३ धावांनी निसटता विजय मिळवत विजेतेपदावर आपले नाव कोरले.
विजयी संघाला ११ हजार रुपये रोख आणि भव्य विजयी चषकाने सन्मानित करण्यात आले.
नयन लक्ष्मण सूर्यवंशी याच्या दमदार कामगिरीमुळे तो सामनावीर ठरला.
इनोव्हेटर्स संघाच्या वतीने प्रशांत देवरे, महेंद्र पाटील, कुलदीप पाटील, नयन सूर्यवंशी, आयुष पटवारी, चेतन चित्ते, विशाल पाटील, देवा परदेशी, जयेश पाटील आणि शुभम कदम यांनी उल्लेखनीय कामगिरी केली.
या स्पर्धेमुळे भडगाव परिसरातील क्रीडाप्रेमींना दर्जेदार क्रिकेट पाहण्याची संधी मिळाली.
विजयी संघाचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत असून, स्थानिक क्रीडा क्षेत्राला नवसंजीवनी मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम