नानासो. बळीराम पवार यांचे निधन

बातमी शेअर करा...

धुळे l प्रतींधी

शासकीय कॉलनी, वाडीभोकर रोड, धुळे येथील रहिवासी व शिंदखेडा एस.एस. व्ही.पी.एस महाविद्यालयाचे संचालक नानासो. बळीराम मोतीराम पवार उर्फ हेमंत फुला पवार ( मूळ गाव : वरपाडे, ता.शिंदखेडा, जि. धुळे ) यांचे आज गुरुवार, दि. ७ डिसेंबर २०२३ रोजी सायंकाळी ६.३० वाजता वृध्दपकाळाने दुःखद निधन झाले.

त्यांची अंत्ययात्रा शुक्रवार, दि. ८ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ११ वाजता “योगक्षेम”, शासकीय कॉलनी, दीनबंधू आश्रम शाळेजवळ, वाडीभोकर रोड, धुळे येथील राहत्या घरुन देवपूर अमरधाम या ठिकाणी निघेल.

ते धुळे जिल्ह्यातील एल. आय.सी. मधील ज्येष्ठ विमा प्रतिनिधी होते. त्यांचे पश्चात पत्नी, ३ मुली, २ मुले, जावाई, सुना, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. ते एम.आय.टी. कॉलेज, लोणी काळभोर येथील विभागप्रमुख प्रा.सतीश बळीराम पवार व अलिबाग येथील जिल्हा ग्रंथालय अधिकारी अजित बळीराम पवार यांचे वडील तसेच जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष विलास भाऊलाल पाटील यांचे सासरे होत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम