नाभिक व्यावसायिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा – पालकमंत्री गुलाबराव पाटील
नाभिक व्यावसायिकांना साहित्य किटचे वाटप : जिल्ह्यात पहिलाच भव्य मेळावा
नाभिक व्यावसायिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा – पालकमंत्री गुलाबराव पाटील
नाभिक व्यावसायिकांना साहित्य किटचे वाटप : जिल्ह्यात पहिलाच भव्य मेळावा
धरणगाव / जळगाव l प्रतिनिधी
सर्व लहान मोठ्या कार्य समारंभात घरभर वावरणारा आपल्या हक्काचा सदस्य व कमीत कमी भांडवलावर अख्ख घर चालवणारा बारा बलुतेदार मधील एकमेव व्यवसायीक म्हणजे नाभिक दादा.
व्यावसायिक बांधव हा कष्टाळू आणि प्रामाणिक सेवेमुळेच त्याचे सच्चा समाज मित्र म्हणून स्थान आजही अबाधित आहे.
राजा आणि रंक दोघांनाही झुकायला लावणारा हा एकमेव बलुतेदार असून मी नाभिक व्यावसायिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
ना. गुलाबराव पाटील हे नाभिक समाजाच्या व्यावसायिक बांधवांना पाळधी येथिल सुगोकी लॉन्सवर आयोजित किट वाटपा प्रसंगी बोलत होते. जिल्ह्यात प्रथमच जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविल्यामुळे सर्व स्तरावर कौतुक होत आहे.
पालकमंत्री गुलाबराव पुढे म्हणाले की, व्यक्तीच्या जीवनातील प्रत्येक टप्प्यावर होणाऱ्या कुटुंबाच्या धार्मिक सोपस्कारात सामील होणारा अविभाज्य घटक म्हणजे नाभिक असून समाजासाठी धरणगाव व मेहरूण शिवारातील मोहाडी रोड लगतच्या ओपन स्पेस मध्ये प्रत्येकी 30 लक्ष प्रमाणे सामाजिक सभागृह मंजूर करणार असल्याचे सांगितले.
तसेच गरजू व होतकरू नाभिक व्यावसायिक बांधवांना लवकरच दर्जेदार टपरी, खुर्ची व आवश्यक साहित्य देणार असून त्यासाठी समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी समिती तयार करून लाभार्थी निवडावे असे आवाहन केले.
तसेच शाळेतील मुलीना एक हजार सायकली वाटप करणार असल्याचे सांगितले. या प्रसंगी नाभिक बांधवांना व्यवसायासाठी शासनाच्या असलेल्या योजनांची सविस्तर माहिती देवून मंत्री गुलाबराव पाटील यांचा तरुणांना मदतीचा हात व उद्योग विभागाची साथ असल्याचे उद्योग केंद्राचे व्यवस्थापक राजेंद्र डोंगरे यांनी सांगितले.
यावेळी मुख्यमंत्री व पंतप्रधान रोजगार निर्मिती बाबतचे विविध स्टॉल लावण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी हा उपक्रम राजकीय कार्यक्रम नसून सामाजिक बांधिलकीतून घेतल्याचे सांगून नाभिक बांधव खऱ्या अर्थाने एकत्र यावेत यासाठी कार्यक्रमाचे नियोजन केले असल्याचे सांगितले.
सूत्रसंचालन गजानन शिंदे सर व गोपाल सोनवणे यांनी केले तर आभार संदीप फुलापागर यांनी मानले.
यावेळी धरणागाव जळगाव तालुक्यातील गावा – गावावातील सुमारे 900 व्यावसायिकाना साहित्याचे किट पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन भाऊ सो गुलाबराव पाटील फाऊंडेशन व जी. पी. एस. ग्रुप मार्फत करण्यात आले होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी जी. पी. एस. ग्रुप मित्र परिवार , शाळेचे चेअरमन विक्रम पाटील व सर्व सदस्यांनी यांनी मेहनत घेतली
जिल्ह्यातील उपक्रमशील नेता म्हणजे गुलाबभाऊ
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी विविध लोकोपयोगी उपक्रम राबवून सर्व सामान्यांना दिलासा देण्याचे काम करत आहे. बारा बलुतेदारांच्या सुख – दुखात सामील होणारा नेता, उपक्रमशील नेता, म्हणजे गुलाबभाऊ असून आमच्यासाठी ते कोहिनूर हिरा असल्याचे
नाभिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष देविदास सोनवणे, महिला प्रदेशाध्यक्ष भारतीताई सोनवणे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख निलेश पाटील, भानुदास विसावे, मुकुंदराव नन्नवरे, गोपाल सोनवणे, बंटी नेरपगार यांनी गुलाबभाऊंच्या कार्याचे कौतुक करतना सांगितले.
याप्रसंगी नाभिक संघटनेचे महिला प्रदेशाध्यक्ष भारतीताई सोनवणे, संगीताताई गवळी, जिल्हाध्यक्ष देविदास सोनवणे, रविंद्र निकम, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख निलेश पाटील, तालुकाप्रमुख डी.ओ.पाटील, जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे, चर्मकार संघटनेचे भानुदास विसावे, माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे, गोपाल सोनवणे, बंटी नेरपगार, उपजिल्हा प्रमुख नरेंद्र सोनवणे,
माजी सभापती नंदू पाटील, प्रेमराज पाटील, दुध संघाचे रमेश आप्पा पाटील, दिलीप जगताप, अर्जुन पाटील, डॉ. कमलाकर पाटील, प्रकाश झुरके, महेश निकम, दिलीप पगारे, सोनू पगारे, राहुल जगताप, जिल्हा उद्योग केंद्राचे प्रशांत पाटील, उद्योग निरीक्षक एस पी लासूरकर, प्रशिक्षण समन्वयक समीर भाटिया यांच्यासह नाभिक समाज बांधव व्यावसायिक लोकप्रतिनिधी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम