
निखिल चौधरी यांच्या हस्ते भीमनगर परिसरातील विकासकामांचे भूमिपूजन व पाहणी
निखिल चौधरी यांच्या हस्ते भीमनगर परिसरातील विकासकामांचे भूमिपूजन व पाहणी
ड्रेनेज, गटर, पेव्हर ब्लॉक व सार्वजनिक टॉयलेट बांधकामांना गती; नागरिकांचा प्रतिसाद
अंबरनाथ : प्रतिनिधी अंबरनाथ शहरातील वार्डातील भीमनगर परिसरात विविध विकासकामांचे भूमिपूजन व पाहणी युवासेना कार्यकारिणी सदस्य निखिल सुनील चौधरी यांच्या हस्ते उत्साहात पार पडली. या कामांमध्ये पाव मार्ग, अंडरग्राउंड ड्रेनेज लाईन्स, गटर बांधकाम, पेव्हर ब्लॉक बसविणे तसेच सार्वजनिक टॉयलेट व बाथरूम बांधकाम या महत्त्वाच्या सुविधा समाविष्ट आहेत.
या कार्यक्रमावेळी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्री. चौधरी यांचे मनःपूर्वक स्वागत केले. विकासकामांबद्दल नागरिकांनी आनंद व्यक्त करत कृतज्ञता दर्शविली.
दिवाळीपूर्व स्वच्छता मोहिमेची सुरुवात
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर परिसरातील सर्व घरांच्या बाहेरील भागांचे रंगकाम करण्याच्या स्वच्छता व सौंदर्यीकरण उपक्रमाचीही सुरुवात श्री. चौधरी यांच्या हस्ते करण्यात आली.
प्रत्यक्ष पाहणी आणि त्वरित कारवाई
यावेळी श्री. चौधरी यांनी ड्रेनेज लाईन्स, बाथरूम व नागरी सुविधांची प्रत्यक्ष पाहणी करून नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या. ड्रेनेज ब्लॉकेजसंबंधी तक्रारींची तत्काळ दखल घेत, नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्वरित साफसफाईच्या सूचना दिल्या.
या सर्व विकासकामांमुळे भीमनगर परिसरातील स्वच्छता, सुविधा आणि सौंदर्यीकरणाला नवी दिशा मिळणार असून, नागरिकांच्या दैनंदिन जीवनमानात लक्षणीय सुधारणा होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम