नूतन मराठा महाविद्यालयात “डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या कार्यावर व्याख्यान

बातमी शेअर करा...
नूतन मराठा महाविद्यालयात “डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या कार्यावर व्याख्यान
   
जळगाव । नूतन मराठा महाविद्यालय व श्री शिवाजी शिक्षण संस्था दर्यापूर यांच्या संयुक्त विद्यमाने नूतन मराठा महाविद्यालयात इतिहास विभाग आयोजित डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊराव देशमुख यांचे जीवन व कार्य” या विषयावर डॉ. दिलीप चव्हाण यांचे व्याख्यान झाले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल.पी. देशमुख अध्यक्षस्थानी होते तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ.अतुल के बोडके उपस्थित होते.
डॉ. दिलीप चव्हाण यांनी डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या शैक्षणिक संघर्षापासून अनेक पैलूंवर प्रकाश टाकला डॉ. देशमुख यांचे कृषी विषयक धोरण बहुआयामी व्यक्तित्व स्पष्ट केले. डॉ. पंजाबराव देशमुख यांनी तंत्रज्ञान विद्यालय, कृषी विद्यालय, वैद्यकीय विद्यालय सुरू करून शिक्षण क्षेत्रात फार मोठे योगदान दिले आहे. डॉ. पंजाबराव देशमुख हे सत्यशोधक होते त्यांनी कधी जातीभेद मांनला नाही व नेहमी भारतीयांसाठी लढण्याचे कार्य शेवटपर्यंत सुरू ठेवले. आज काही मंदिर संस्थानांकडे इतका पैसा आहे की त्यावर अख्खा भारत चालू शकतो. मंदिराला सोन्याचा कळस बांधण्या ऐवजी शाळा सुरू करा, दवाखाने बांधा .. जातिभेद पुरा, सेवाभाव धरा हे पंजाबराव देशमुख यांचे ब्रीदवाक्य होते. प्राचार्य डॉ. एल.पी. देशमुख यांनी देखील डॉ.दिलीप चव्हाण यांच्या वक्तव्यास दूजोरा दिला. सूत्रसंचालन प्रा. तेजल पाटील यांनी केले. पाहुण्यांचा परिचय डॉ. मंगला तायडे यांनी केला. शेवटी डॉ. राजेश बुरांगे यांनी आभार मानले. इतिहास विभागातील प्रा. वंदना पाटील सुशील निकम केतन शिरतुरे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. कार्यक्रमास महाविद्यालयाचे सर्व कनिष्ठ व वरिष्ठ सर्व प्राध्यापक प्राध्यापिका यांसह जे.डी. पाटील सांगडूदकर महाविद्यालय दर्यापूर येथील प्राचार्य डॉ. अतुल बोडखे, प्रा. राजेश उमाळे, प्रा. विनोद कोकणे, प्रा.रवी गावंडे उपस्थित होते.
बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम