पंकज बोरोले यांचा वाढदिवस ६ ते १३ डिसेंबर पर्यंत साजरा होणार

वाढदिवसानिमित्त विविध सेवाभावी कार्यक्रमांचे आयोजन

बातमी शेअर करा...

चोपडा । प्रतिनिधी

पंकज शैक्षणिक सामाजिक संस्था तथा पंकज बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे संचालक पंकज बोरोले यांचा वाढदिवस ६ ते १३ डिसेंबर यादरम्यान साजरा केला जाणार आहे. या निमित्त विविध सेवाभावी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत.

दि. ६ ते ११ डिसेंबर दरम्यान पंकज चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात १६ संघ सहभागी झाले आहेत. दि. ११ डिसेंबर रोजी प्लॅस्टिक मुक्त परिसर अभियान राबविण्यात येणार आहे. दि.१२ डिसेंबर रोजी सकाळी ६ वाजता भव्य मॅरेथॉन स्पर्धा व ९ वाजता भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

दि. ६ ते १२ डिसेंबर दरम्यान विद्यार्थ्यासाठी पाठांतर, गायन, वादन , नृत्य, वक्तृत्व आदी स्पर्धा घेण्यात येणार आहेत. दि.१३ डिसेंबर रोजी सायं. ६ वाजता प्रेरणादायी वक्ते प्रा. नितीन बानुगडे पाटील यांचे प्रेरणादायी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.

पंकज शैक्षणिक सामाजिक संस्थेचे संचालक पंकज बोरोले हे मितभाषी आणि आपल्या कामाप्रती निष्ठा असणारे व्यक्तीमत्व आहे. चोपडा शहरात आधुनिक दर्जेदार घरांची नवी संकल्पना रूजवणारे पंकज बोरोले हे स्वतः उच्चशिक्षित आहेत. त्यांनी बीई मेकॅनिकल केले असून इंग्लंडमध्ये एमबीए केले आहे.

काम करत असताना त्यांनी उच्च गुणवत्ता आणि दर्जा याला सातत्याने प्राधान्य दिले त्यामुळे आज जवळपास संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पंकज बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे ८ हजाराच्यावर संतुष्ट ग्राहक आहेत. पुण्यातील व्यवसाय उत्तम चालत असताना देखील ते आपल्या मायभूमीकडे वळले.
सामाजिक बांधिलकी जोपासणे, ग्राहकांची सेवा करणे आणि समाजासाठी सातत्याने कार्य करत राहणे ही भावना आणि शिकवण वडिलांनी दिली आहे.

त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे

१.युवकांसाठी उत्कृष्ट सेवेसाठी पुरस्कार. २.उत्कृष्ट उद्योजकता विकास कार्यक्रमासाठी पुरस्कार. ३. समाजसेवेसाठी सर्वोत्कृष्ट पुरस्कार. ४.उत्कृष्ट कुटुंब कल्याण कार्यासाठी पुरस्कार. ५.नैसर्गिक आपत्ती दरम्यान केलेल्या उत्कृष्ट कार्यासाठी पुरस्कार.

६. सर्वोत्तम रेनवॉटर हार्वेस्टिंगसाठी पुरस्कार. ७. आदिवासींसाठी केलेल्या उत्कृष्ट कार्यासाठी पुरस्कार. ८.उत्कृष्ट जनसंपर्कासाठी पुरस्कार. ९. समाजातील महिलांच्या उन्नतीसाठी केलेल्या उत्कृष्ट कार्यासाठी पुरस्कार. १०.रोटाकिड्स रोटरी प्रांतपालांचा विशेष कौतुक पुरस्कार.११. विवेक ग्रामीण केंद्राचा बांबू सेवक पुरस्कार आदी पुरस्कारांनी सन्मानित झाले आहेत.

चोपडा तालुक्याचे आराध्य दैवत श्री महामंडलेश्वर बाल योगीजी महाराज यांची कार्यक्रमास विशेष उपस्थिती राहणार आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम