पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे ५ फेब्रुवारी रोजी शासकीय अभियांत्रिकी महाविदयालय आयोजन

पात्रता धारकासाठी ५०० पेक्षा जास्त रिक्तपदे उपलब्ध

बातमी शेअर करा...

पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे ५ फेब्रुवारी रोजी शासकीय अभियांत्रिकी महाविदयालय आयोजन
पात्रता धारकासाठी ५०० पेक्षा जास्त रिक्तपदे उपलब्ध

जळगाव प्रतिनिधी

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव व शासकीय अभियांत्रिकी महाविदयालय, जळगाव यांच्या संयुक्त विदयमाने पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन जळगाव शासकीय अभियांत्रिकी महाविदयालय करण्यात आले आहेत.

येत्या ५ फेब्रुवारी, २०२५ रोजी सकाळी १०.०० वाजता पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात येणार आहे.
नोकरी करु इच्छुक उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी असुन सर्वसाधारण १०वी, १२ वी / सर्व शाखेतील पदवीधारक / आ.टी.आय सर्व ट्रेड/ बी.ई/ बी.सी.ए/एम.बी.ए तसेच सर्व डिग्री धारक पात्रता धारकासाठी ५०० पेक्षा जास्त रिक्तपदे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.

या मेळाव्यात जिल्हयातील व जिल्हयाबाहेरील जैन फॉर्म फ्रेश, युवा शक्ती, नाशिक, धुत ट्रान्समिशन, छ. संभाजीनगर, हिताची अॅस्टींमो ब्रेक सि.प्रा.लि. जळगाव, किरण मशिन टुल्स, जळगाव, गुजरात अंबुजा, चाळीसगाव, फ्युबर टेक्स, जळगाव, टी. डब्लयु.जे, जळगाव, उत्कर्ष स्मॉल बँक, जळगाव, प्रतिभा प्लास्टिक, जळगाव, मानराज मोटर्स, जळगाव असे नामांकित आस्थापनाकडुन ऑनलॉईन पद्धतीने रिक्तपदे कळविण्यात आले आहेत.
या मेळाव्याची लाभ घेण्याकरीता उमेदवारांनी https://rojgar.mahaswayam.gov.in/#/home/index या संकेतस्थळावर लॉग-इन करुन रिक्तपदांसाठी अल्पाय करावे, तसेच ज्या उमेदवारांनी नाव नोदणी केलेली नाही त्यांनी देखील सर्व शैक्षणिक पात्रतेच्या कागदपत्रांसह मेळाव्यास मुलाखतीच्या दिवशी हजर राहावे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम