पत्ता न दिल्याच्या कारणावरून आजी-नातीला मारहाण; सोन्याची चैन व नथ तोडली

बातमी शेअर करा...

पत्ता न दिल्याच्या कारणावरून आजी-नातीला मारहाण; सोन्याची चैन व नथ तोडली

प्रतिनिधी | जळगाव
शहरालगतच्या रोहनवाडी येथे एका महिलेसह तिच्या नातीला केवळ शिक्षकाचा पत्ता न दिल्याच्या कारणावरून मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना शनिवारी (२४ मे) सकाळी घडली. याप्रकरणी चार महिलांविरोधात जळगाव तालुका पोलिस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुनंदा आनंद निकम (वय ५७, रा. रोहनवाडी) या आपल्या नातीसोबत घरी होत्या. यावेळी मंगल मुरलीधर सुरवाडे, अश्विनी शालिक सुरवाडे, गीता धनराज वाघ आणि सरिता संजय दांडगे (सर्व रा. महादेवनगर, जळगाव) या चार महिला त्यांच्या घरी आल्या. त्यांनी सुनंदा निकम यांच्याकडे त्यांच्या नातीला शिकवणाऱ्या ‘पाटील मॅडम’चा पत्ता विचारला. मात्र, निकम यांनी तो पत्ता देण्यास नकार दिला.

या कारणावरून संतप्त झालेल्या चारही महिलांनी सुनंदा निकम यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. “आजीला मारू नका” असे म्हणणाऱ्या त्यांची नात वंक्षिका हिलाही मारहाण करण्यात आली. या झटापटीत सुनंदा निकम यांच्या गळ्यातील सोन्याची चैन आणि नाकातील नथ तोडून नुकसान करण्यात आले.

घटनेनंतर पीडित महिलेने जळगाव तालुका पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून चारही महिलांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल जितेंद्र तायडे करीत आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम