परप्रांतीय ट्रकच्या क्लिनरची आत्महत्या

खेडी शिवारातील घटना

बातमी शेअर करा...

परप्रांतीय ट्रकच्या क्लिनरची आत्महत्या

खेडी शिवारातील घटना

जळगाव : शेतातील झाडाला गळफास घेत झाडू घेवून आलेल्या ट्रकच्या क्लिनरने आत्महत्या केली. ही घटना बुधवारी दुपारच्या सुमारास खेडी शिवारात उघडकीस आली. पतिराज सिंह छत्रपाल सिंह (वय २७, रा. किग्राम पुरवा, पो. झाकरावाल, देवसर, सिंगरौली मध्यप्रदेश) असे मयताचे नाव आहे. त्याच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

शहरातील एमआयडीसीतील एका कंपनीत गुहावटी येवून झाडूचा ट्रक आला होता, कंपनीतील कामगार हा ट्रक रिकामा करीत असल्याने गाडीतील क्लिन पतिराज सिंह हा गाडीतच झोपलेला होता, तर चालक हा कंपनीच्या आवारात अंघोळीसाठी गेला होता, काळीचेळानंतर क्लिनर हा गाडीतून उतरुन खेडी परिसरातील एका शेतात गेला. त्याने प्लास्टीकच्या दोरीच्या सहाय्याने खेडी शिवारातील शेतातील एका झाडाला गळफास घेत आपलीजीवनयात्रा संपविली.

मोबाईलवरुन पटली ओळख शेतात पाणी भरण्यासाठी आलेल्या शेतकऱ्याला शेतातील झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत इसम दिसला. त्याने त्याठिकाणी धाव घेतली असता, मयताचा मोबाईल हा वाजत होता. त्याने फोन उचलून पतिराज याने गळफास घेतल्याची माहिती दिल्यानंतर घटनेची ओळख पटली.

आत्महत्येचे कारण अस्पष्ट त्यानुसार घटनेची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करुन मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केला. मयताच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम