पशुपतीनाथ – महाशिवरात्री निमित्त पशुपतीनाथचे रुद्राक्ष वाटप

माजी उपमहापौर डॉ अश्विन भाऊ सोनवणे यांचा उपक्रम

बातमी शेअर करा...

बातमीदार | ७ मार्च २०२४

पशुपतीनाथ – महाशिवरात्री निमित्त पशुपतीनाथचे 1 लाख रुद्राक्ष वाटप

माजी उपमहापौर डॉ अश्विन भाऊ सोनवणे यांचा उपक्रम

जळगांव – येथील मनपाचे माजी उपमहापौर डॉ अश्विन भाऊ शांताराम सोनवणे यांनी महाशिवरात्री निमित्त नेपाळ मधील पशुपतीनाथ मंदिरात सिध्द केलेले 1 लाख रुद्राक्षांचे वाटप जळगांव शहरातील विविध मंदिरातून करण्यात येणार आहे. याचा शिवभक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले आहे.

पशुपतीनाथ

सिहोर येथील प.पू. पंडित जी मिश्रा यांच्या प्रेरणेने प्रेरित होऊन मनपाचे माजी उपमहापौर डॉ अश्विन भाऊ सोनवणे यांनी महाशिवरात्री निमित्त सलाबादाप्रमाणे विविध कार्यक्रमाचे आयोजन करीत असतात.

https://www.facebook.com/share/p/ms4LgkpU3pUU9KYt/?mibextid=oFDknk

या वर्षी जळगाव शहरातील १ लाख शिवभक्तांना नेपाळ येथील पशुपतीनाथ मंदिरात सिध्द केलेले रुद्राक्ष वाटप केले जाणार आहेत. त्यांच्या या धार्मिक उपक्रमाचे जळगाव शहरातील शिवभक्तांकडून स्वागत करण्यात येत आहे.

याचा शिवभक्तांनी व भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ.अश्विन भाऊ सोनवणे यांनी केले आहे. ज्या शिवभक्तांना हे रुद्राक्ष हवे असतील त्यांनी 91456 77779 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

हे ही वाचा👇

स्वखर्चातून बाकडे वाटप – माजी उपमहापौर डॉ.अश्विन सोनवणे यांच्या स्वखर्चातून शहरात बाकडे वाटप मोहीम

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम