
पहिले आंदोलन-मग निवेदन हा युवासेनेचा बाणा – पालकमंत्री गुलाबराव पाटील
शिवसेना-युवासेनेच्या सदस्य नोंदणीत उत्स्फूर्त प्रतिसाद
पहिले आंदोलन-मग निवेदन हा युवासेनेचा बाणा – पालकमंत्री गुलाबराव पाटील
शिवसेना-युवासेनेच्या सदस्य नोंदणीत उत्स्फूर्त प्रतिसाद
पाळधी | जळगाव प्रतिनिधी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी युवकांशी थेट संवाद साधताना म्हटलेकी , शिस्त, सेवा आणि संघर्ष म्हणजेच शिवसेना व युवासेना आहे. म्हणूनच युवकांचे नेतृत्व हे शिवसेनेच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. शिवसेनेच्या झेंड्याखाली उभं राहून नावनोंदणी करून एक जबाबदारी स्वीकारण्याचा संकल्प करा. युवासेना ही नव्या युगाची शिवसेना आहे. “पहिले आंदोलन, मग निवेदन” हा युवासेनेचा बाणा आहे. ही नोंदणी नसून संघटन मजबुतीचा हा संकल्प आहे. गाव ते जिल्हा, जिल्हा ते मंत्रालय – हा प्रवास नोंदणीपासून सुरू होतो. आज जे युवक शिवसेनेचे सदस्य झालेत, त्यांच्यातूनच उद्याचे आमदार, खासदार, मंत्री तयार होवू शकतात. अशा जोशपूर्ण शब्दांत शिवसेनेचे जेष्ठ नेते तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पाळधी येथे आयोजित शिवकार्य सदस्य नोंदणी शिबिराला दिशा दिली. या शिबिरात २०० हून अधिक नविन सदस्यांची नोंदणी झाली असून युवासेनेच्या जोमाने नवा ऊर्जा संचार होत असल्याचे चित्र पहायला मिळाले. शिबिरात सहभागी युवकांच्या उत्साहाचं मंत्री गुलाबराव पाटील यांनी कौतुक केले.
या कार्यक्रमात जिल्हा प्रमुख तथा माजी महापौर विष्णू भंगाळे यांनी सांगितले की, शिवसेना म्हणजे विकास, विश्वास आणि जनतेची सेवा ही आपली त्रिसूत्री असून जिल्ह्यात सर्वाधिक नोंदणीचा निर्धार आपण केला आहे. प्रत्येक गावात, प्रत्येक वॉर्डात कार्यकर्ते पोहोचत असल्याचे त्यांनी सांगितले.
या शिबिरात माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांच्या पुढाकाराने व मार्गदर्शनाखाली तसेच त्यांच्या २८ तारखेला असलेल्या वाढदिवसाच्या निमित्ताने औचित्य साधून जवळपास २०० हून अधिक सदस्य नोंदणी करण्यात आली. यावेळी गुलाबराव पाटील यांनी सर्व नविन शिवसैनिकांचे विशेष स्वागत करत पुढील कार्यात योगदान देण्याचं आवाहन केलं.
कार्यक्रमाला तालुका प्रमुख डी. ओ. पाटील, उपजिल्हा प्रमुख पी. एम. पाटील, विधानसभा प्रमुख संजय पाटील, मागासवर्गीय सेना जिल्हा प्रमुख मुकुंदराव नन्नवरे, संघटक रवींद्र चव्हाण, सरपंच विजय पाटील, दीपक भदाणे, आबा माळी, प्रशांत झंवर, दिलीप माळी, अमोल पाटील, संजय महाराज, अनिल माळी, नवल पारधी, भरत पाटील, गणेश महाजन, पिंटू कोळी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे यांनी केले आभार जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी मानले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम