पहूर येथे बारावीच्या विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू; आत्महत्येचे कारण अस्पष्ट

बातमी शेअर करा...

पहूर येथे बारावीच्या विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू; आत्महत्येचे कारण अस्पष्ट

पहूर (ता. जामनेर) : गोविंद नगर परिसरात राहणाऱ्या बारावीच्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आपले जीवन संपविल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी (४ जुलै) रात्री घडली. महेश अनिल गोल्हारे (वय १८) असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून, तो जामनेर येथील इंदिराबाई ललवाणी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात विज्ञान शाखेत शिक्षण घेत होता.

माहितीनुसार, रात्री सुमारे ९ वाजेच्या सुमारास महेश याने घराशेजारील पत्र्याच्या शेडमध्ये गळफास घेतल्याचे कुटुंबीयांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने त्याला शेजारील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलवले; मात्र वैद्यकीय अधिकारी डॉ. बिलाल यांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले.

या घटनेमुळे कुटुंबीयांमध्ये आणि परिसरात शोककळा पसरली आहे. महेशच्या पश्चात आई-वडील, भाऊ आणि बहिण असा परिवार आहे. आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. शवविच्छेदनासाठी महेशचा मृतदेह पहूर ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम