पाचोरा येथे आमदारांच्या उपस्थितीत पाचोरा तालुका शिवसेनेची २७ रोजी बैठक

उपस्थितीचे आवाहन

बातमी शेअर करा...

पाचोरा येथे आमदारांच्या उपस्थितीत पाचोरा तालुका शिवसेनेची २७ रोजी बैठक

उपस्थितीचे आवाहन

पाचोरा प्रतिनिधी

आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पाचोरा तालुका शिवसेना, युवासेना, महिला आघाडी व अंगिकृत संघटनेची संघटनात्मक महत्वपूर्ण बैठक उद्या दिनांक 27 मार्च 2025, गुरुवार, दुपारी 1.00 वाजता शिवालय शिवसेना मध्यवर्ती कार्यालय, छत्रपती शिवाजी महाराज चौक, पाचोरा येथे आयोजित केली आहे.

तरी जिल्हासमन्वयक, संघटक, विधानसभा क्षेत्र प्रमुख, तालुकासमन्वयक, संघटक, उपशहर प्रमुख, उपतालुकाप्रमुख, विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, गणप्रमुख, उपगण प्रमुख, तसेच मा. नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व नगरसेवक न. पा. पाचोरा, सभापती, उपसभापती व संचालक मंडळ कृ उ बा समीती पाचोरा, व्हॉ. चेअरमन, शेतकी संघ पाचोरा, सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य, चेअरमन, व्हॉ. चेअरमन व संचालक मंडळ, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, बूथ प्रमुख व शिवसेना अंगीकृत संघटना यांच्या उपस्थितीची अपेक्षा आहे.

सर्वांनी या बैठकीला आवर्जून उपस्थित राहावे,असे आवाहन जिल्हाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, शहरप्रमुख यांनी केली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम