पाडळसे प्रकल्पास 4,890 कोटीची मान्यता

अमळनेर व चोपडा तालुक्यातील 43,600 हेक्टर लाभक्षेत्र

बातमी शेअर करा...

दै बातमीदार | १४ डिसेंबर २०२३

निम्न तापी प्रकल्प, पाडळसे, ता. अमळनेर, जि. जळगाव या प्रकल्पाला रू.4,890 कोटी किंमतीची चतुर्थ सुधारित प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे.

17 TMC पाणी वापर करून मुख्यत्वे अमळनेर व
चोपडा तालुक्यातील 43,600 हेकटर लाभक्षेत्र असलेल्या निम्न तापी प्रकल्पाच्या कामाची सुरुवात सन 1999 मध्ये झाली. मात्र काम धीम्या गतीने होत होते. आता, वेगेवेगळ्या अडचणींवर मात करून सन 2021 मध्ये प्रकल्पाचे काम पुन्हा मार्गी लावण्यात आलेले आहे.

सन 2010 मध्ये या प्रकल्पाचा पाणी वापर 10.4 TMC पर्यंत कमी करून 25,657 हेक्टर लाभक्षेत्र मर्यादित करणेत आले होते. मात्र, आता शासनाने पाण्याचे पुन्हा नियोजन करून खान्देशच्या वाट्याचे 17 TMC पाणी वापर निम्न तापी प्रकलपासाठी मंजूर केले आहे व लाभक्षेत्र देखील पुन्हा 43,600 हेक्टर एवढे निश्चित केले आहे.

चतुर्थ सुधारित प्रशासकीय मान्यता प्रदान करताना शासनाने प्रकल्पाच्या अद्यावत रु.4,890 कोटी एवढ्या किमतीस मान्यता दिली आहे. संपूर्ण प्रकल्पासाठी 7000 हेक्टर एवढे भूसंपादन करावे लागते व त्याचप्रमाणे पंधरा गावांचे पुनर्वसन करावे लागते.

एवढ्या कामासाठी लागणारा वेळ वाचावा व प्रकल्पाचे फायदे शेतकऱ्यांना लवकर मिळावे म्हणून प्रकल्पाचे काम सध्या सुरू असल्याप्रमाणे दोन टप्प्यात करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

यामध्ये पहिल्या टप्प्यात 10.4 टीएमसी पाणी वापर करून 25
हजार 657 हेक्टर लाभक्षेत्र तयार करण्यात येणार आहे व त्यासाठी आवश्यक तेवढे भूसंपादन व पुनर्वसन करण्यात येईल. यासाठी रू. 3331 कोटी एवढ्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे.

मात्र या मंजुरीत सगळ्यात महत्त्वाची बाब अशी आहे की मूळ प्रकल्पामध्ये संपूर्ण पाणी वापर शेतकरी स्वखर्चाने लिफ्ट करून वापरतील असे गृहीत होते, त्या ऐवजी शासनाच्या माध्यमातून संपूर्ण प्रकल्पावर लिफ्ट इरिगेशन स्कीम तयार करण्यात येणार आहे याचा संपूर्ण खर्च राज्य शासन उचलणार आहे.

यासाठी 600 कोटी रुपयांची विशेष तरतूद करणेत आली आहे. त्यामुळे प्रकल्पाचे लाभ शेतकऱ्यांपर्यंत लवकर पोहोचण्यास मदत होईल. PMKSY सारख्या वेगवेगळ्या केंद्राच्या योजनेत या प्रकल्पाचा समावेश करणेसाठी राज्यशासन प्रयत्नशील असून प्रकल्पास निधीची कमतरता पडू देणार नाही.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम