
पारोळा शहरात हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा
पारोळा शहरात हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा
ठिकठिकाणी महाप्रसाद वाटप
पारोळा, पारोळा शहरात हनुमान जन्मोत्सव विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने अनेक मंदिरांमध्ये महाप्रसाद वाटपाचे आयोजन करण्यात आले.
श्री मोठे मारुती मंदिरात सकाळी ६ वाजता माजी नगराध्यक्ष सुरेंद्र बोहरा यांच्या हस्ते अभिषेक आणि पूजा झाली. दुपारी ११ वाजता आमदार अमोल पाटील यांनी महाआरती करून महाप्रसाद वाटपाचा शुभारंभ केला. यावेळी माजी नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष व माजी नगरसेवक नितीन सोनार, विलास वाणी, डॉ. शिनकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
याशिवाय, कजगाव चौफुली आणि बाजारपेठेतील शनी मंदिराजवळील हनुमान मंदिरातही जन्मोत्सव उत्साहात साजरा झाला. या ठिकाणीही महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री मोठे मारुती मंडळाचे जितेंद्र बारी, बालू शिंपी, गम्पू सोनार, रामकृष्ण मांडगे, अनिल वाणी, चिन्मय शेंडे, रोशन गुजराथी, प्रशांत मेटकर, विकी शिंपी, बापू धोबी यांच्यासह सर्व हनुमान भक्तांनी विशेष परिश्रम घेतले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम