नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाच्या नियुक्तीला स्थगिती

रात्री उशिरा पत्रक काढून हा निर्णय

बातमी शेअर करा...

नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाच्या नियुक्तीला स्थगिती
रात्री उशिरा पत्रक जारी काढून हा निर्णय
मुंबई वृत्तसंस्था

महायुतीच्या सरकारमधील पालकमंत्रिपदाचं वाटप करण्यात आले. यामध्ये अनेक मंत्र्यांना पालकमंत्रिपदापासून वगळण्यात आलंय. त्यावरून मंत्र्यांमध्ये नाराजी उफाळून आली आहे. पालकमंत्रीपदावरून रायगडमध्ये मोठा गोंधळ झाला.या वादाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात शुक्रवारी रात्री मोठ्या राजकीय हालचाली पहायला मिळाल्या. राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने नाशिक आणि रायगडचं पालकमंत्री पदाच्या नियुक्तीला स्थगिती दिली आहे. १९ जानेवारी रोजी रात्री उशिरा पत्रक जारी काढून हा निर्णय घेण्यात आला.

मंत्रीपदावर वर्णी लागल्यानंतर भरत गोगावले यांनी रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी मोर्चेबांधणी केली होती. जिल्ह्यातील शिवसेना आणि भाजप आमदारांनी रायगडचे पालकमंत्री म्हणून फलोत्पादन व रोजगार हमीमंत्री भरत गोगावले यांची निवड करण्याची मागणी केली होती. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या आदिती तटकरे यांच्याकडे रायगडचे पालकमंत्रीपद आले आहे. रायगड जिल्ह्यात शिवसेनेचे तीन, भाजपचे तीन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा एकच आमदार आहे. तरीही तटकरे यांना पद मिळाले हे विशेष मानले जाते. हा निर्णय मनाला पटण्यासारखा नाही, अशी प्रतिक्रिया गोगावले यांनी व्यक्त केली.

पालकमंत्रीपदासाठी भरत गोगावले यांना डावलून आदिती तटकरे यांना रायगडचे पालकमंत्रीपद देण्यात आलं. त्यामुळे रायगडमधील शिवसैनिक संतप्त झाले. मुंबई-गोवा महामार्गावर महाड जवळ शनिवारी रात्री उशिरा शिवसैनिकांनी रस्त्यावर टायर जाळून याचा निषेध केला

पालकमंत्री पद डावलल्यांतर दादा भुसे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणाले, पालकमंत्रिपदी डावलणे अशातला काही भाग नाही. जी जबाबदारी दिली ती पुढे नेणे हे प्रत्येक कार्यकर्त्याचे काम असते. मला या ठिकाणी जी काही जबाबदारी दिली ती आम्ही पुढे नेऊ असे ते म्हणाले .

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम