पिंप्री येथील बंद असलेले घर फोडून घरातील रोख रक्कम व संसार उपयोगी वस्तू लंपास

कजगाव ता भडगाव येथून जवळच असलेल्या पिंप्री ता पाचोरा येथील बंद असलेले घर फोडून घरातील रोख रक्कम व संसार उपयोगी साहित्य चोरून नेल्याने एकच खळबळ उडाली आहे पिंप्री येथील महिला पुष्पाबाई प्रभाकर नेरपगार ह्या पिंप्री येथे आपल्या घरी एकट्याच राहतात त्या आपल्या कामानिमित्ताने बाहेर गावी गेल्याने भोमट्यानि बंद घर असल्याचा फायदा घेऊन बंद घराच्या मागील बाजूची भिंत फोडून आत प्रवेश केला व घरातील तब्बल बेचाळीस हजार रुपये रोख रक्कम व पाच ग्रॅम सोने व अन्य संसार उपयोगी साहित्य चोरू नेले आहे सदरील मुद्देमाल रोख व इतर साहित्य हे जवळपास एकलाख रुपये च्या जवळपासचे आहे महिला गावाहून घरी आल्यावर ही घटना लक्षात आली होती महिलेचे घर पडके असून महिला विधवा असल्याने तिने आपले पडके घर बांधण्यासाठी पै पै रुपये जमा केले होते मात्र घर बांधण्याचे स्वप्न आता चोरट्यांच्या हात सफाईने अर्धवटच राहिल्याने महिला धाय ठोकून रडत होती

बातमी शेअर करा...
बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम