प्रजासत्ताक दिन – ग.स,सोसायटी चोपडा शाखेत प्रजासत्ताक दिन साजरा

संस्थेचे जेष्ठ सभासद असलमखान सरफराजखान यांचे शुभहस्ते ध्वजारोहण

बातमी शेअर करा...

बातमीदार | शनिवार दि २७ जानेवारी २०२४

प्रजासत्ताक दिन – ग.स,सोसायटी चोपडा शाखेत प्रजासत्ताक दिन साजरा

संस्थेचे जेष्ठ सभासद असलमखान सरफराजखान यांचे शुभहस्ते ध्वजारोहण

चोपडा – जळगांव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी (ग.स.सोसायटी) विभाग चोपडा शाखेत भारतीय प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहन संस्थेचे जेष्ठ सभासद असलमखान सरफराजखान यांचे शुभहस्ते करण्यात आले.

प्रजासत्ताक दिन

संस्थेचे स्थानिक संचालक योगेश सनेर तसेच मंगेश भोईटे यांनी संचालक झाल्यापासून चोपडा शाखेचे ध्वजारोहन हे स्वतः न करता ती संधी दोघेही संचालक सभासदांना देत असतात.

सभासदांना खऱ्या अर्थाने सन्मान प्राप्त करुन देण्याच्या सभासद हिताच्या विविध योजना संस्थेचे अध्यक्ष उदय मधुकर पाटील यांचे नेतृत्वात सुरु असून चोपडा येथील संचालकांनी सभासदांचा सन्मानाचा

भाग म्हणून चोपडा शाखा अंतर्गत ध्वजारोहन व पात्र सभासदांना मिळणारे सर्व धनादेश देखील आजवर सभासदांच्याच हस्तेच वितरित केलेले आहेत.

https://fb.watch/pQmecF5RNm/?mibextid=Nif5oz

संस्थेचे स्थानिक संचालक योगेश सनेर यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, गेल्या दिड वर्षापासून ग.स.सोसायटीत खऱ्या अर्थाने संपूर्ण कार्यकारी मंडळाच्या मार्गदर्शन व सहकार्यामुळे सभासदांची सत्ता आहे.

याप्रसंगी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सभासदांमधूनच चोपडा उर्दु शाळेतील शिक्षक खान असलमखान सरफराज खान यांचे शुभहस्ते करण्यात आले. यावेळी सहकार गटाचे नेते व शिक्षक संघटनेचे नेते आर. एच. बाविस्कर सर,

प्रजासत्ताक दिनी उर्दू संघटनेचे प्रतिनिधी शेख सय्यद जुनेद तसेच प्रमोद देवरे व आशिष बडगुजर यांचेसह बहुसंख्य सभासद व कर्मचारी वृंद हजर होते. या प्रसंगी प्रास्ताविक संस्थेचे संचालक मंगेश भोईटे यांनी

तर स्थानिक संचालक योगेश सनेर यांनी मनोगत व्यक्त केले. सुत्रसंचलन उपशाखाधिकारी संजय पाटील यांनी तर आभार उज्वल शिंदे यांनी मानले.

हे ही वाचा👇

महाआंदोलन – आदिवासी कोळी जमातीच्या राज्यव्यापी महाआंदोलनास सुरूवात

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम