प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण समारंभास उपस्थित राहण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ

बातमी शेअर करा...

प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण समारंभास उपस्थित राहण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ

जळगाव,I प्रतिनिधी – भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 76 व्या वर्धापन दिनानिमित्त रविवार, दिनांक २६ जानेवारी, २०२५ रोजी सकाळी ९.१५ वाजता पोलीस कवायत मैदान, पोलीस मुख्यालय, जळगाव येथे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ होणार आहे.

या कार्यक्रमानंतर शालेय विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास सर्व स्वातंत्र्य सैनिक, विविध राजकिय पक्षाचे नेते, पदाधिकारी, शासकीय अधिकारी व कर्मचारी आणि जळगाव शहरातील सर्व नागरीक यांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे. असे आवाहन जळगाव जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

जळगाव शहरातील जास्तीत जास्त नागरिकांना या शासकीय समारंभात भाग घेता यावा, यासाठी दि. २६ जानेवारी, २०२५ रोजी सकाळी ८.३० ते १०.०० च्या दरम्यान ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय समारंभ आयोजित करण्यात येऊ नये.

जर एखाद्या कार्यालयास अथवा संस्थेला आपला स्वतःचा ध्वजारोहण समारंभ करावयाचा असल्यास त्यांनी तो समारंभ सकाळी ८.३० च्या पूर्वी किंवा १०.०० च्या नंतर करावा. अशा सुचना तहसिलदार डॉ. सुरेश कोळी यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिल्या आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम