प्रत्येकाने १ वृक्ष लावणे गरजेचे – प्रतिक महाजन
श्री. राेकडा हनुमान व्यायाम शाळेत वृक्षाराेपण
रावेर –
पर्यावरणाचा हाेणारा ऱ्हास थांबविण्यासाठी प्रत्येकाने एक वृक्ष लावणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन प्रसंगी केले.
भगवंताने सर्वात जास्त अक्कल मनुष्य प्राण्याला दिली असून मनुष्य हाच विनाशाच्या मार्गावर स्वतःला नेत असताे. निसर्गाचा समताेल ढासळल्यास पृथ्वीचा अंत हाेण्यास वेळ लागणार नाही. म्हणून प्रत्येकाने एक तरी वृक्ष लावून निसर्गाचा समताेल राखण्यास मदत करावी जेणेकरून आपली पुढची पिढी जगू शकेल. एक वृक्षाची लागवड करण्यास जास्तीत जास्त अर्धातास लागेल. त्याच्यावर वेळ लागणार नाही. जीवनात एक जरी झाड लावून ते माेठे केले तरी तुम्ही तुमची सामाजिक जाबबदारी पार पाडत असल्याचे आत्मीक समाधान तुम्हाला निश्चितच मिळेल. वृक्षांची माेठ्या प्रमाणात कत्तल हाेत असून त्याप्रमाणात झाडे लावली जात नाही. त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास हाेत आहे. हा हाेणार ऱ्हास तुमच्या पुढच्या पिढीसाठी धाेकादायक आहे. आपली पुढच्या पिढीचा विचार करून किमान प्रत्येकाने एक झाड लावणे गरजेचे आहे. नुसते वृक्षाराेपण करून चालणार नाही. त्याला जगविणे हेही गरजेचे असल्याचेही ते म्हणाले.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम