
प्रलंबित मागण्यांसाठी महावितरणचे सेवानिवृत्त कर्मचारी उपोषणाला बसणार !
दहा वर्षांपासून मिळाला नाही अतिरिक्त कामाचा मोबदला
प्रलंबित मागण्यांसाठी महावितरणचे सेवानिवृत्त कर्मचारी उपोषणाला बसणार !
दहा वर्षांपासून मिळाला नाही अतिरिक्त कामाचा मोबदला
जळगाव I प्रतिनिधी
महावितरण कंपनीतील चाळीसगांव विभागातील सन 2014 व जळगांव विभागातील सन 2015-16 या कालावधीतील केलेल्या 75 तासांवरील अतिरीक्त कामाचा मोबदला (ओ.टी.) मिळण्यासाठी तब्बल 8 ते 10 वर्षे वाट पहावी लागलेली आहे. कंपनी प्रशासनाकडे वारंवार विनंती अर्ज सादर केलेले आहेत. परंतु क्लेम निकाली निघत नसल्याने नाईलाजास्तव श्री.भोळे यांनी दि.10 डिसेंबर 2024 रोजी उपोषणाची नोटीस देवुन दि.22 जानेवारी 2025 पासुन उपोषणाला बसणार असल्याचे कळविले आहे.
अखिल भारतीय विद्युत सेवानिवृत्त कर्मचारी महासंघाच्या वतीने दि. 01 जानेवारी 2025 रोजी जळगांव परिमंडळ प्रशासनाला पत्रव्यवहार करुन प्रलंबित असलेले ओ.टी.क्लेम उपोषणापुर्वी मंजुरी देवुन निकाली काढण्यासाठी विनंती करण्यात आलेली आहे. परंतु आजतागायत क्लेम निकाली निघालेले नसल्याने, तसेच परीमंडळ प्रशासनाच्या वतीने कोणतीही चर्चा करण्यात आलेली नसल्याने श्री. भोळे हे दि. 22 जानेवारी 2025 पासून महावितरण कंपनीचे विद्युत भवन कार्यालय, जुनी औद्याेगिक वसाहत, जळगांव समोर उपोषण सुरु करणार आहेत.
उपोषणाला अखिल भारतीय विद्युत सेवानिवृत्त कर्मचारी महासघाच्या वतीने पाठिबा देत असुन क्लेम निकाली न निघाल्यास उपोषण अधिकाधिक तिव्र करण्याचे संघटनेच्या वतीने ठरविण्यात आले आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम