प्रवेश – काँग्रेसचे डी.जी. पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश

मंत्री गिरीश महाजन ,अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रवेश

बातमी शेअर करा...

बातमीदार l शनिवार दि. २ मार्च २०२४

जळगाव ;– काँग्रेसचे माजी सचिव डी.जी. पाटील यांनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत आपल्या काही समर्थकांसह आज मुंबई येथील कार्यालयात भाजपात प्रवेश केला.

डी.जी. पाटील यांच्यासोबत माजी तालुकाध्यक्ष रतिलाल चौधरी, माजी शहराध्यक्ष राजेंद्र न्यायधे, माळी महासंघाचे तालुकाध्यक्ष गोपाल बाविस्कर यांनी देखील भाजपात प्रवेश केला. यावेळी भाजपचे जेष्ठ नेते सुभाष पाटील, डॉ. हेडगेवार नगरचे उपसरपंच चंदन पाटील हे उपस्थित होते. दरम्यान, डी.जी. पाटील यांच्या भाजपा प्रवेशानंतर कॉंग्रेसला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम