प्राथमिक आरोग्य केंद्रातील शिपायाने घेतला गळफास

बातमी शेअर करा...

प्राथमिक आरोग्य केंद्रातील शिपायाने घेतला गळफास

जामनेर प्रतिनिधी

जामनेर तालुक्यातील पहूर पेठ गावात राहणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील शिपायाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी (दि. ८) दुपारच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी पहूर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मृताचे नाव कैलास भागवत देशमुख (वय ५४) असे असून ते लोहारा प्राथमिक आरोग्य केंद्रात शिपाई पदावर कार्यरत होते. कुटुंबात पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. बुधवारी घरात कोणी नसताना देशमुख यांनी घरातच स्वतःला गळफास लावून आत्महत्या केली. काही वेळाने त्यांचा मुलगा अभिषेक घरी परतल्यावर ही घटना उघडकीस आली.

कैलास देशमुख यांना तत्काळ पहूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र वैद्यकीय अधिकारी डॉ. बिलाल शेख यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. पहूर पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. घटनेने पहूर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम