प . वि.पाटील शाळा बहिणाबाई पुरस्काराने सन्मानित

शाळेचा विविध उपक्रमात होणारा सहभाग

बातमी शेअर करा...

प . वि.पाटील शाळा बहिणाबाई पुरस्काराने सन्मानित
जळगांव प्रतिनिधि

के . सी.ई.सोसायटी संचालित गुरुवर्य परशुराम विठोबा पाटील प्राथमिक विद्यामंदिर या शाळेला नुकतेच झालेल्या बहिणाबाई महोत्सवामध्ये उत्कृष्ट शाळेचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

शाळेचे विद्यार्थी प्रिय शिक्षक , शाळेचा विविध उपक्रमात होणारा सहभाग , लोककलेतील सहभाग , शैक्षणिक कामगिरी बद्दल शाळेला अमित तायडे जिल्हा व्यवस्थापक नाबार्ड (भारत सरकार) , दिपक परदेशी , भरारी फाउंडेशन अध्यक्ष , विनोद ढगे बहिणाबाई महोत्सव समन्वयक यांच्या हस्ते सन्मान पत्र देऊन गौरविण्यात आले.

प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका धनश्री फालक , कल्पना तायडे , योगेश भालेराव आधी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम