
फरकांडे येथे उद्या गुणवंतांचा सत्कार
फरकांडे येथे उद्या गुणवंतांचा सत्कार
फरकांडे , ता . एरंडोल : येथे २ ९ मे रोजी सायंकाळी सात वाजता जन्मभूमी फाउंडेशन व ग्रुप ग्रामपंचायत फरकांडे यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष प्रावीण्य मिळविलेल्या गुणवंतांचा सत्कार सोहळ्याचे आयोजन मारुती चौक फरकांडा येथे आयोजित केला आहे . मान्यवरांचा सत्कार पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते होईल . अध्यक्षस्थानी आमदार चिमणराव पाटील असतील . प्रमुख अतिथी म्हणून माजी पालकमंत्री डॉ . सतीश पाटील , जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष उज्वला पाटील , शिवसेना जिल्हा महिला प्रमुख महानंदाताई पाटील , शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ . हर्षल माने , जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष हिम्मतराव पाटील आदी मान्यवर उपस्थित राहतील . कार्यक्रमाचे आयोजन जन्मभूमी फाउंडेशनचे प्रमुख साहेबराव पाटील , सदस्य रोहिदास पाटील , सरपंच निर्मलाबाई पाटील , उपसरपंच शरद पाठक यांनी केले आहे

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम