फिरत्या मोबाईल सायन्स व्हॅनचा १४०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी घेतला लाभ

विद्यापीठाच्या राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोग यांच्यातर्फे आयोजन

बातमी शेअर करा...

फिरत्या मोबाईल सायन्स व्हॅनचा १४०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी घेतला लाभ
विद्यापीठाच्या राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोग यांच्यातर्फे आयोजन

जळगाव (प्रतिनीधी) : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोग यांच्या वतीने मोबाईल सायन्स व्हॅनचा नंदुरबार जिल्ह्यातील शासकीय माध्यमिक आश्रमशाळा तसेच झेङ पी. शाळा तालंबा आणि एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूल अक्कलकुवा येथील परिसरातील जवळपास १४०० पेक्षा शालेय विद्यार्थ्यांनी लाभ घेतला.

दि. २० व २१ मार्च रोजी नंदुरबार जिल्ह्यातील शासकीय माध्यमिक आश्रमशाळा सलसाडी, बोराड, जांभई, तालंबा आणि कुंभर्खान झेङ पी. शाळा तालंबा आणि एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूल अक्कलकुवा येथे ही मोबाईल सायन्स व्हॅन विद्यार्थ्यांना पाहण्यासाठी नेण्यात आली. विद्यार्थ्यांनी या व्हॅनमधील विज्ञान ३० प्रात्यक्षिकांची पहाणी केली. या फिरती विज्ञान प्रयोगशाळेचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन रूजवणे, विज्ञान विषयाची आवड निर्माण करणे आणि त्यांचे कुतुहल वाढवणे हा आहे. या फिरती सायन्स व्हॅनचा जवळपास १४००विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. अशी माहिती समन्वयक डॉ.एस.एस.घोष यांनी दिली. या उपक्रमाचे नेतृत्व डॉ. अमरदीप पाटील यांनी केले. ऋषीकेश, रोहित, अक्षय आणि नरेंद्र यांनी विद्यार्थ्यांनी शालेय विद्यार्थ्यांना माहिती दिली.या प्रयोगशाळेच्या आयोजनासाठी लागणारे आर्थिक सहाय्य विद्यापीठातील CAD-P प्रोग्रॅम मार्फत डॉ. के.एस. विश्वकर्मा मुख्य अन्वेषक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

तीनही जिल्ह्यातील ज्या शाळांना या मोबाईल सायन्स व्हॅनचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी विद्यापीठाच्या राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोग केंद्राचे समन्वयक डॉ. एस.एस. घोष यांच्याशी संपर्क (मो.क्र. 8999545292 व ईमेल ssghosh@nmu.ac.in) साधावा असे आवाहन विद्यापीठाच्या वतीने करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम