बदली – मनपा प्रशासक तथा आयुक्त विद्या गायकवाड यांची बदली

अतिरिक्त आयुक्तांकडे पदभार देण्याचे आदेश

बातमी शेअर करा...

बातमीदार | मंगळवार दि 19 मार्च 2024 |

बदली – मनपा प्रशासक तथा आयुक्त विद्या गायकवाड यांची बदली

अतिरिक्त आयुक्तांकडे पदभार देण्याचे आदेश

जळगाव – येथील महानगरपालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक विद्या गायकवाड यांच्या बदलीचे आदेश राज्यशासनाच्या नगर विकास विभागाने काढले आहेत. त्यांना त्यांच्या पदाचा कार्यभार हा अतिरिक्त आयुक्तांकडे देण्याबाबत आदेशित करण्यात आले आहेत.

लोकसभा सार्वत्रिक बदल्या – आयुक्त, पनवेल व जळगांव

राज्य शासनाच्या उप सचिव प्रियांका कुलकर्णी यांनी मनपा प्रशासक तथा आयुक्त यांच्या बदली आदेशात म्हटले आहे की, लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाने महानगरपालिकामधील आयुक्त, अतिरिक्त आयुक्त व उपायुक्त या पदावरील अधिकाऱ्यांच्या बदल्यांविषयी मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या असून त्यानुसार महानगरपालिकेतील आयुक्त या पदावर कार्यरत अधिकाऱ्यांच्या सक्षम प्राधिकार्‍यांच्या मान्यतेने बदल्या करण्यात आल्या आहेत.

त्यांच्या पदस्थापनेचे आदेश स्वतंत्रपणे काढण्यात येणार असून यामध्ये पनवेल महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख व जळगाव महानगरपालिका प्रशासक तथा आयुक्त विद्या गायकवाड यांचा समावेश आहे. त्यांना त्यांच्या पदाचा कार्यभार हा अतिरिक्त आयुक्त यांच्याकडे सोपवण्याबाबत आदेशित करण्यात आले आहे.

हे ही वाचा👇

लोकार्पण – विकसित भारत रथाचे आ सुरेश भोळे यांच्या हस्ते लोकार्पण

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम