
बसमध्ये बॅग ठेवण्यावरून प्रवासी आणि वाहकामध्ये वाद
पोलिस ठाण्यात बस दाखल
जळगाव : धावत्या बसमध्ये बॅग ठेवण्याच्या वादावरून प्रवासी आणि वाहक यांच्यात वादावादी होऊन झटापट झाली. या घटनेत वाहकाचा चष्मा तुटला, तर प्रवासी महिलेच्या नाकाजवळ दुखापत झाली. हा वाद विकोपाला गेल्याने बस थेट जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात नेण्यात आली. अखेर पोलिसांच्या मध्यस्थीनंतर तडजोड होऊन बस पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झाली.
मंगळवारी (२५ मार्च) दुपारी २ वाजता जळगाव बसस्थानकातून चाळीसगावकडे जाणारी बस निघाली. बस जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ पोहोचली असता वाहक आणि एका प्रवाशामध्ये बॅग ठेवण्यावरून वाद सुरू झाला.
वाहकाने प्रवाशाला बॅग पुढे ठेवण्यास सांगितले, कारण ती इतर प्रवाशांच्या डोक्यावर पडू शकते.मात्र, प्रवासी बॅग वर ठेवण्याचा आग्रह धरत असल्याने वाद वाढला.झटापटीत वाहकाचा चष्मा तुटला, तर प्रवासी महिलेच्या नाकाजवळ दुखापत झाली.महिलेच्या पतीने वाहकानेच पत्नीला मारल्याचा आरोप केला, तर वाहकाने प्रवाशाने चष्मा तोडल्याचा आरोप केला.बस थेट पोलिस ठाण्यात नेलीवाद मिटत नसल्याने बसचालकाने बस थेट जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात नेली.पोलिसांनी दोघांनाही शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले.अखेर पोलिसांच्या मध्यस्थीनंतर तडजोड करण्यात आली आणि बस पुन्हा मार्गस्थ झाली. या वादामुळे सुमारे पाऊण तास बस खोळंबली, प्रवासी उन्हाच्या कडाक्यात ताटकळत बसले होते.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम