धरणगावच्या बांधकाम व्यवसायिकाची १ कोटी १५ लाखांची फसवणूक

१३ जणांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

बातमी शेअर करा...

बांधकाम व्यवसायिकाची १ कोटी १५ लाखांची फसवणूक

१३ जणांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

जळगाव प्रतिनिधी

धरणगाव येथील एका बांधकाम व्यावसायिकाची जुन्या घराच्या सौदा पावतीनंतर १ कोटी १५ लाख रुपये घेउन मिळकत खरेदीसाठी टाळाटाळ करून फसवणूक केल्याचा प्रकार घडला असून पैसे परत मागितल्यावर त्यांना जिवेठार मारण्याची धमकीही देण्यात आली. हा प्रकार १५ मे २०२३ ते ३ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत घडला. याप्रकरणी जळगाव शहर पोलिस ठाण्यात १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुनील चौधरी रा. धरणगाव हे बांधकाम व्यवसायिक असून, जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात. जळगाव महानगरपालिकेच्या हद्दीतील सिटी सर्व्हे क्रमांक २११२/६० या जुन्या बांधकाम असलेल्या घराचा व्यवहार ठरवून सौदा पावती करण्यात आली. त्यानुसार चौधरी यांनी संबंधित व्यक्तींना १ कोटी १५ लाख रुपये दिले आणि करारनामा करण्यात आला. करारनाम्यानंतर काही काळाने सदर मिळकत खरेदी करून देण्यास टाळाटाळ सुरू झाली. चौधरी यांनी रक्कम परत मागितल्यावर त्यांना जिवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली. अनेकदा पाठपुरावा करूनही घराच्या खरेदीची प्रक्रिया झाली नाही आणि दिलेली मोठी रक्कमही परत मिळाली नाही. त्यामुळे चौधरी यांची आर्थिक फसवणूक झाल्याने त्यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

१३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

या प्रकरणात शहर पोलिस ठाण्यात १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात मनोज लीलाधर वाणी, कल्पना मनोज वाणी (दोघेही रा. जिल्हा परिषद कॉलनी), शैलेंद्र हेमचंद्र भिरुड, हेमलता उर्फ तनुजा शैलेंद्र भिरुड (दोघेही रा. महाबळ कॉलनी), तिलोत्तमा दीपक इंगळे, दीपक पीतांबर इंगळे (दोघेही रा. मामलदे, ता. चोपडा), संदीप हरिभाऊ पाटील (रा. श्रीकृष्ण कॉलनी), राजेंद्र गोपाळ सावदेकर (रा. आसोदा, ता. जळगाव), शेखर भास्कर भिरुड, शिरीष भास्कर भिरुड, नरेंद्रकुमार दत्तात्रय भिरुड, ज्ञानेश्वर दत्तात्रय भिरुड, गौरव कृष्णा भिरुड (सर्व रा. महाबळ कॉलनी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक (सपोनि) शीतलकुमार नाईक करीत आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम