बाजार समितीचा सेस न भरल्यामुळे व्यवसायिकास ११ हजारांचा दंड

बुधगाव चेक पोस्ट येथे वादग्रस्त घटना, व्यवसायिकाकडून कर्मचाऱ्यांशी असभ्य वर्तन

बातमी शेअर करा...

बाजार समितीचा सेस न भरल्यामुळे व्यवसायिकास ११ हजारांचा दंड

बुधगाव चेक पोस्ट येथे वादग्रस्त घटना, व्यवसायिकाकडून कर्मचाऱ्यांशी असभ्य वर्तन

चोपडा । प्रतिनिधी

चोपडा तालुक्यात बुधगाव चेक पोस्ट येथे बाजार समितीच्या मार्केट सेस भरण्याच्या मुद्द्यावरून वादग्रस्त घटना घडली. दि. १२ डिसेंबर २०२४ रोजी

एका व्यापाऱ्याने कृ ऊ बा समितीचे सेस भरण्यास नकार दिला आणि कर्मचाऱ्यांशी असभ्य भाषा वापरली त्यास ११ हजाराचा दंड ठोठावण्यात आला आहे.

बाजार

या बाबत सविस्तर वृत्त असे कि, बाजार समितीचे मार्केट सेस बुडवणारे व्यावसायिक भगवान खंडू सूर्यवंशी, समाधान पंढरीनाथ पाटील, व आप्पा कौतिक पाटील रा. मूकटी जि. धुळे यांनी

बुधगाव चेक पोस्ट येथे बाजार समिती कर्मचाऱ्यांशी अरेरावीची भाषा करीत असभ्य वर्तन केले. सदर प्रकारामुळे बाजार समितीचे संचालक विजय शालिकराम पाटील,

सचिव आर. बी. सोनवणे, उप सचिव जितेंद्र देशमुख, एन आर सोनवणे, लिपिक राकेश पाटील, योगेश निकम, निकितेश पाटील राकेश पवार तसंच इतर पदाधिकारी

https://www.facebook.com/share/p/15mzjxGq3q/

आणि कर्मचारी घटनास्थळी उपस्थित होत. वादग्रस्त व्यवहार करणाऱ्या व्यवसायिकाचे वाहन (एम.एच. २० – १३५३) जप्त करण्यात आले, तसेच त्यांच्याकडून ११ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.

सभापती नरेंद्र वसंतराव पाटील यांनी घटनेची गंभीर दखल घेत अशा प्रकारे सेस न भरणाऱ्या व्यापाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

तसेच अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून कृ ऊ बा समिती प्रशासनाकडून कडक पावले उचलण्याचे संकेत दिले असून वेळ प्रसंगी गुन्हा दाखल करण्यात येईल, असा ईशारा दिला आहे.

हे हि वाचा👇

आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या विरूध्द फेक नरेटिव — प्रकाश क्षीरसागर मु.पो.खर्डी ता. चोपडा

२३ वा बालगंधर्व संगीत महोत्सव दि. ३ ते ५ जानेवारी २०२५ रोजी संपन्न होणार

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम