बापाच्या प्रचारासाठी लेकरं सरसावली !
डॉ. प्रियंका पाटील, सुमित पाटील यांनी पालथा घातला मतदारसंघ किशोर आप्पा पाटील यांना वाढता प्रतिसाद
बापाच्या प्रचारासाठी लेकरं सरसावली !
डॉ. प्रियंका पाटील, सुमित पाटील यांनी पालथा घातला मतदारसंघ किशोर आप्पा पाटील यांना वाढता प्रतिसाद
भडगाव / प्रतिनिधी
सध्या विधानसभा निवडणुकीचा जोर वाढत चालला आहे. पाचोरा – भडगाव मतदारसंघात आमदार किशोर आप्पा पाटील यांचा मुलगा सुमित व लेक डाॅ. प्रियंका पाटील यांनी वडिलांसाठी मतदारसंघ पालथा घातला आहे.
पाचोरा व भडगाव या दोन्ही तालुक्यातील प्रत्येक गावात प्रचार फेरी पुर्ण केली आहे. त्यांना प्रचारात प्रचंड प्रतिसाद मिळाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
पाचोरा-भडगाव मतदार संघात राजकीय वातावरण प्रचंड तापलेले आहे. सर्वच उमेदवार मतदारसंघ पायाखाली घालत आहे.
मात्र त्यात आमदार तथा महायुतीचे उमेदवार आप्पा पाटील यांची लेक डाॅ. प्रियंका पाटील व पुत्र सुमित पाटील यांनी देखील संपुर्ण मतदारसंघ पिंजून काढला.
डाॅ.प्रियंका पाटलांनी पाचोरा तालुका काढला पिंजून
आमदार किशोर आप्पा पाटील यांची कन्या डाॅ. प्रियंका पाटील यांनी दि. 18 ऑक्टोबर पासून हरेश्वर पिंपळगाव येथून प्रचाराचा शुभारंभ केला.
त्यानंतर संपुर्ण पाचोरा तालुका 21 दिवसात त्यांनी घरोघरी जाऊन पिंजून काढून बापासाठी मत मागीतले.
त्यांना मतदारांकडून उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. प्रत्येक गावात शेकडोची रॅली निघाल्या. त्यांचे प्रत्येक गावात जंगी स्वागत करण्यात आले.
डाॅ. प्रियंका पाटील म्हणाल्या की, मला प्रत्येक गावात मिळालेले प्रेमाने भारावून गेल्याचे सांगीतले. युवा सेनेचे जिल्हाप्रमुख जितेंद्र जैन,
जय बारांवकर जिल्हाप्रमुख, विद्यार्थी सेना समवेत सूरज शिंदे, राहुल पाटील, विशाल पाटील, समीर शेख, यश ठाकूरसागर महाजन तथा संपूर्ण शहर व ग्रामीण शिवसेना,
युवासेना पदाधिकारी त्यांचे युवा सेनेचे सर्व सहकारी प्रचारात सहभागी झाले.
लेकाने भडगाव तालुका घातला पालथा
आमदार किशोर आप्पा पाटील यांचे पुत्र सुमित ने ही 18 ऑक्टोबर पासून भडगाव तालुक्यात प्रत्येक घरोघरी जाऊन मतदारांचे आशिर्वाद घेतले.
त्यांना प्रत्येक गावात प्रचंड प्रतिसाद मिळाला. किशोर आप्पांनी आमच्या गावाचा विकास केला आहे. त्यामुळे आम्ही तुमच्या वडिलांसोबत असल्याचे ग्वाही मतदारांनी दिल्याचे सांगीतले.
ग्रामिण भागात त्यांचा शंभर टक्के दौरा पुर्ण झाला असून शहरात दोन दिवसापासुन प्रचाराला प्रारंभ केला आहे. त्याच्यां समवेत पुरुषोत्तम माळी जिल्हा समन्वयक युवासेना निलेश पाटील
जिल्हासघटक युवासेना नितीन महाजन उपशहरप्रमुख शिवसेना, योगेश सुर्यवंशी तालुका सरचिटणीस युवासेना, अनिल महाजन, समाधान पाटील,
जगदीश पाटील, स्वप्निल पाटील तालुकासंघटक शिवसेना, रविंद्र हिम्मत पाटील, राहुल पाटील यांच्यासह युवा सेनेच्या पदाधिका-यांनी सहभाग नोंदवला.
लेकरांनी प्रचाराची धुरा घेतली खांद्यावर
आमदार किशोर आप्पा पाटील यांची लेक डाॅ.प्रियंका पाटील व पुत्र सुमित पाटील यांनी या निवडणुकीच्या प्रचाराची धुरा आपल्या खांद्यावर घेतली.
तर दुसरीकडे आमदाराच्या पत्नी सुनीता पाटील यांनी पाचोरा शहरात प्रचाराची मोहीम उघडली. डाॅ.प्रियंका पाटील व सुमित पाटील यांना मिळणारा प्रतिसाद हा अभुतपुर्व होता.
दोघांनी बापाच्या विजयासाठी स्वत:ला झोकून दिले आहे. आप्पांनी आमच्यापेक्षा मतदारसंघाच्या विकासाला प्राधान्य दिले आहे.
ते पुर्ण मतदारसंघाला कुटुंबच मानता त्यामुळे आपण सर्वांनी किशोर आप्पांच्या पाठीमागे भक्कम पणे उभे राहीले पाहीजे असे अवाहन दोघांनी केले आहे.
हे ही वाचा👇
व्यापार वृध्दिसाठी भयमुक्त वातावरण निर्माण करणार- आमदार किशोर आप्पा पाटील
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम