बारावीच्या विद्यार्थ्याने उचलले टोकाचे पाऊल ..

भुसावळ शहरातील घटनेने खळबळ

बातमी शेअर करा...

बातमीदार l गुरुवार दि. २९ फेब्रुवारी २०२४

भुसावळ;- इंग्रजी पेपर अवघड गेल्याच्या नैराश्येतून शहरातील समृद्धी पार्क येथे राहणाऱ्या बारावीतील विद्यार्थ्याने राहत्या घरात दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी २७ फेब्रुवारी दुपारी उघडकीला आले आहे. यासंदर्भात भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले आहे.

इदांत पंकज मंडलेचा (वय १७ रा. समृध्दी पार्क, भुसावळ) असे मयत विद्यार्थ्याचे नाव आहे. इदांत हा कुटुंबीयासह वास्तव्याला होता. तो यावर्षी बारावीच्या वर्गात शिक्षण करीत होता. काही दिवसांपासून बारावीची परीक्षा सुरू आहे. यामध्ये इदांत यानेदेखील बारावीचा इंग्रजी विषयाचा पेपर दिला होता.

परंतु हा पेपर त्याला अवघड गेल्याने तो गेल्या काही दिवसांपासून नैराश्येत होता. दरम्यान त्याने मंगळवारी २७ फेब्रुवारी रोजी राहत्या घरात कोणीही नसताना छताच्या पंख्याला दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर नातेवाईकांनी एकच आक्रोश केल्याचे पाहायला मिळाले. या घटनेबाबत रात्री भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल गणेश चौधरी हे करीत आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम