
बेंडाळे महिला महाविद्यालयात मतदार दिनानिमित्त विविध उपक्रम तहसीलदार
डॉ. शितल राजपूत यांचे स्पर्धा परिक्षांविषयी मार्गदर्शन
बेंडाळे महिला महाविद्यालयात मतदार दिनानिमित्त विविध उपक्रम तहसीलदार
डॉ. शितल राजपूत यांचे स्पर्धा परिक्षांविषयी मार्गदर्शन
जळगाव प्रतिनिधी
डॉ. अण्णासाहेब जी डी बेंडाळे महिला महाविद्यालय जळगाव मधील राज्यशास्त्र विभाग, स्पर्धा परीक्षा केंद्र, विद्यार्थी विकास विभाग , रासेयो आणि तहसील कार्यालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 24 जानेवारी 2025 रोजी राष्ट्रीय मतदार दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्राचार्य डॉ. गौरी राणे यांनी मतदानाची शपथ दिली. तसेच आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी मतदानाचे महत्व स्पष्ट केले. यावेळी रांगोळी स्पर्धा, पथनाट्य आणि मतदार नोंदणीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सहभागी विद्यार्थी आणि स्वयंसेविकांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. या कार्यक्रमास तहसीलदार मा. डॉ. शितल राजपूत यांनी आपल्या मनोगतातून मतदार दिनाचे महत्त्व स्पष्ट केले. तसेच नवीन मतदार नोंदणी आणि निवडणूकी मध्ये मतदानात जास्तीत जास्त सहभाग घ्यावा याबाबत आवाहन केले.
विद्यार्थिनींनी स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात आपले करिअर घडवावे . यशाला कोणताही शॉर्टकट नसतो, जोपर्यंत स्वतःला अभ्यासात आपण करीत असलेल्या चुकांची जाणीव होत नाही तोपर्यंत यश प्राप्त होत नाही. तसेच अभ्यासात सातत्या, चिकाटी आणि जिद्द कायम ठेवली तर यश नक्कीच प्राप्त होते. आपले मित्र -मैत्रिणी हे सुद्धा अभ्यासाशी संबंधित चर्चा करणारे असले तर अभ्यासासाठी पोषक वातावरण निर्माण होते असे स्पर्धा परीक्षाविषयी मोलाचे मार्गदर्शन त्यांनी केले.
नितीन माळी यांनी मतदार नोंदणी प्रक्रियेची सविस्तर माहिती दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.दीपक पवार, प्रास्ताविक राज्यशास्त्र विभागाचे शांताराम तायडे आणि आभार इतिहास विभाग प्रमुख डॉ.दिपक किनगे यांनी मानले. या कार्यक्रमाला नायब तहसीलदारविनचंद्र भावसार आणि तहसील कार्यालयाचे कर्मचारी, बीएलओ, शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थिनी मोठ्या संखेने उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. शीला राजपूत, प्रा. रत्नप्रभा महाजन, डॉ. सुजाता गायकवाड, डॉ. अशोक पाटील, नुरी तडवी, प्रा अनिल बेलसरे आणि भावेश तायडे यांनी परिश्रम घेतले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम