बोरोले परिवार भाऊबंदकी स्नेह मेळावा उत्साहात

बोरोले परिवारातील २५० सदस्यांचा संमेलनात सह्भाग

बातमी शेअर करा...

बोरोले परिवार भाऊबंदकी स्नेह मेळावा उत्साहात

बोरोले परिवारातील २५० सदस्यांचा संमेलनात सह्भाग
चोपडा प्रतिनिधी

साळवेकर बोरोले परिवार भाऊबंदकीचे दोन दिवसीय स्नेहसंमेलन पंकज ग्लोबल पब्लिक स्कूल येथे उत्साहात झाले. भाऊबंदकीच्या स्नेहसंमेलनासाठी साळवे येथील बोरोले परिवारातील २५० सदस्यांनी सदर संमेलनात सहभाग नोंदवला. सदर संमेलनासाठी महाराष्ट्र व महाराष्ट्र बाहेर नोकरी व व्यवसाय निमित्त बाहेर असलेल्या बोरोले परिवारातील सदस्यांनी सदर संमेलनाचा आनंद घेतला.
एकमेकांच्या सहवासाचा आनंद घेण्यासाठी आणि चिरस्थायी आठवणी निर्माण करण्यासाठी, मित्र आणि कुटुंबीयांना एकत्र आणण्याचा गेट-टूगेदर हा एक उत्तम मार्ग आहे.

पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुरेश बोरोले यांच्या संकल्पनेतून भाऊबंदकीचे स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते. भाऊबंदकीचे स्नेहसंमेलन हे कदाचित महाराष्ट्रातील पहिले असावे. सदर संमेलनात सर्वप्रथम पाहुण्यांचे स्वागत ,नाश्ता – चहापान व सुरुची भोजन देऊन करण्यात आले. तद्नंतर संस्थेच्या विविध शाखांना भेटी देण्यात आल्या.

सायंकाळी ५ वाजता स्नेहसंमेलनाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली .त्यात दीप प्रज्वलन व स्वागत सत्कार करून उपस्थितांचे स्वागत करण्यात आले. संमेलन घेण्यामागची भूमिका प्रस्तावनेतून डॉ. सुरेश बोरोले यांनी मांडली .ते म्हणाले , पूर्वजांसाठी कृतज्ञता व्यक्त करण्याच्या हा कार्यक्रम.. तसेच पितृदोष घालविण्याचा कार्यक्रम.भाऊबंदकित कोण वारलं ते सुद्धा आता समजत नाही म्हणून एकत्र येण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.अडीच ते तीन महिन्यांपासून कार्यक्रमांचे आयोजन व नियोजन सूरू आहे. गावातील ८० % लोक व्यवसाय आणि नोकरी निमित्ताने बाहेर गावी राहतात… पूर्वजांच्या स्मृतींना उजाळा द्यायला सुद्धा आज आपल्याकडे वेळ नाही…. ही एकत्र येण्याची सुरूवात आहे. भाऊबंदकीचा व्हॉट्सॲप ग्रुप तयार करू या… आणि त्यात फक्त निधन वार्ता आणि लग्न स्थळ व्यतिरिक्त इतर पोस्ट टाकू नये… बोरोले परिवाराने कायम स्वरुपी एकत्र राहावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. भाट आपला इतिहास सांभाळतात. जीवनात प्रत्येकाला सुख दुःख असतात पण एकमेकांना समजून वेळ देणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

सदर संमेलनात ज्येष्ठ मंडळी व मान्यवरांचा विशेष सन्मान व सत्कार करण्यात आला. त्यात सुरेश झिपरू बोरोले ,सुभाष पोपट बोरोले, रमेश जयराम बोरोले ,सुभाष देवराम बोरोले, सरस्वती दामोदर बोरोले, डॉ सुरेश पंडित बोरोले ,आत्माराम रामू बोरोले या ज्येष्ठांचा सत्कार करण्यात आला. तसेच पंकज सुरेश बोरोले ,डॉ. चारूशिला व डॉ जयदीप पाळवदे, शुभांगी रोहित बढे – बोरोले ,उन्नती महेश बोरोले, पूजा सुभाष बोरोले, निर्भय सुभाष बोरोले आदिंचा सन्मान करण्यात आला.

लेवा पाटील समाजाच्या इतिहासाची माहिती व बोरोले परिवाराची वंशावळ वाचन विपिन अशोक बोरोले यांनी केले तसेच वंशावळ प्रतींचे वाटप सर्वांना मोफत करण्यात आले तसेच परिवाराची ओळख करून देऊन परिवाराचा ग्रुप फोटो देखील काढण्यात आले व ग्रुप फोटोची कॉपी प्रत तात्काळ फोटो फ्रेम सह उपलब्ध करून देण्यात आली. उपस्थितांचे मनोगत घेण्यात आले तसेच सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे सुद्धा आयोजन करण्यात आले. रात्री सगळ्यांनी सुरुची भोजनाच्या आनंद घेतला व प्रजासत्ताक दिनी झेंडावंदन व विद्यार्थ्याचा भव्य दिव्य कार्यक्रम पाहण्याच्या योग उपस्थितांना घेण्यात आला.
सदर संमेलन यशस्वीतेसाठी मयूर बोरोले ,विपिन बोरोले ,मोहित बोरोले ,मिलिंद बऱ्हाटे आदींनी परिश्रम घेतले

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम