भंडारा येथे आयुध निर्माणीच्या कारखान्यात स्फोट ; ८ जण ठार

७ जण गंभीर जखमी

बातमी शेअर करा...

भंडारा येथे आयुध निर्माणीच्या कारखान्यात स्फोट ; ८ जण ठार

७ जण गंभीर जखमी
भंडारा I प्रतिनिधी
भंडारा येथील लष्कराच्या आयुध निर्माण कारखान्यात शुक्रवारी सडे दहा वाजेच्या सुमारास भीषण स्फोट झाला. या घटनेत आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला असून,७ जण गंभीर जखमी झाले. जिल्हाधिकारी संजय कोलते यांनी सांगितले आहे की, स्फोटामुळे कारखान्याचे छत कोसळून हा अपघात झाला असल्याचे म्हटले आहे.

हा स्फोट एवढा भीषण होता की, त्याचा आवाज ५ किलोमीटर अंतरापर्यंत ऐकण्यात आला. स्फोटानंतर पोलाद व दगडाचे तुकडे दुरवरपर्यंत फेकल्या गेले. अधिकृत सूत्रांच्या माहितीनुसार, हा स्फोट जवाहरनगर स्थित फॅक्ट्रीच्या एलटीपी (लाँग टर्म प्लॅनिंग) सेक्शनमध्ये झाला.

जवाहर नगर भंडारा येथील ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये झालेल्या अपघाती स्फोटानंतर अग्निशमन दलाच्या गाड्या आणि रुग्णवाहिका घटनास्थळी रवाना करण्यात आल्या आहेत, सध्या बचाव कार्य सुरू आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी भंडारा संजय कोलते यांनी दिली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम