भडगाव ते वाडे बस फेर्या सुरु करण्या संबधी पाचोरा आगार प्रमुखांना पञकार अशोक परदेशी यांचे निवेदन

बातमी शेअर करा...

भडगाव/प्रतिनिधी

भडगाव ते वाडे मुक्कामेसह इतर बस फेर्या पुर्ववत तात्काळ सुरु करण्यात याव्यात. या मागणीचे निवेदन वाडे येथील रहिवाशी व भडगावचे पञकार अशोक परदेशी यांनी आज दि. १० रोजी सकाळी भडगाव व पाचोरा आगार प्रमुखांना दिले. यावेळी भडगाव बसस्थानकाचे वाहतुक निरीक्षक एस एस बोरसे यांचेशी चर्चा करण्यात आली. आगार प्रमुखांनी भडगाव ते वाडे बस फेर्या तात्काळ सुरु करु असे आश्वासन दिले. आपल्या एस टी कर्मचार्यांचा संप मिटल्यानंतर भडगाव बस स्थानकामार्गाने लांब पल्ल्याच्या बसफेर्या तसेच भडगाव तालुक्यात ग्रामीण भागातही बस फेर्या सुरु करण्यात आलेल्या आहेत. माञ भडगाव ते वाडे एकही बस फेरी पाचोरा आगाराने सुरु केलेली नाही. प्रवाशी कुठे पायी तर कुठे खाजगी वाहनांवर प्रवास करीत आहेत. प्रवासाचा असहय ञास बस फेर्या बंद असल्याने प्रवाशांना ञास सहन करावा लागत आहे. भडगाव ते वाडे दरम्यान जवळपास १६ ते १८ गावांसाठी एकही बस सुरु झालेली नाही. भडगाव ते वाडे मुक्कामेसह इतर बस फेर्या पाचोरा आगाराने तात्काळ सुरु कराव्यात. वेळोवेळी मागण्या करुनही संबंधितांचे दुर्लक्ष होत आहे. बस सेवा सुरु झाल्यावर भडगाव, नवे वढधे, जुने वढधे, कोठली, निंभोरा, बोदर्डे, देव्हारी, कनाशी, बोरनार, लोणपिराचे, दलवाडे, घुसर्डी, सावदे, गोंडगाव, बांबरुड प्र ब, नावरे, वाडे, टेकवाडे बुद्रुक आदि गावातील प्रवाशांची प्रवासासाठी सोय होणार आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम