भारतीय जैन संघटनाच्या वतीने उंटाना पौष्टिक चारा पाणी देण्याचे नियोजन

बातमी शेअर करा...

बातमीदार | दि ३० डिसेंबर २०२३

दोन दिवसांपूर्वी चोपडा तालुक्याच्या गंलगी गावाजवळ 85 उंटांच्याकळप अमानुष पणे घेऊन जातांना चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनने कारवाई करत उंट मालकांना ताब्यात घेतले होते व 85 उंट श्रीराम गोपाल गो शाळेत देखभाल साठी ठेवण्यात आले आहे.

इतक्या मोठया प्रमाणावर आलेल्या उंटाना चारा, पाणी देणे जिकरी होत होते तर सर्व परिस्थिती बघता भारतीय जैन संघटनाने पुढाकार घेऊन 100 किलो गुळाचे पाणी पाजणे तसेच विविध वृत्तपत्रा मधून वृत्त वाचून जळगाव येथिल आर.सी. बाफना गो शाळेने भारतीय जैन संघटनेच्या आदेश बरडीया यांच्याशी संपर्क करून 85 उंट हे भुकेने व्याकुळ झाले आहेत.

त्यांच्या साठी आम्ही गोशाळे कडून एक गाडी चारा पाठवत आहोत उंटा साठी व गोमातेसाठी सोयाबीन पिकाचे धान्य व चारा पाठवण्यात येत आहे.असे सांगितले आणि दुपार पर्यंत चाराची व सोयाबीन पिकाचे धान्याची गाडी येऊन गेली.

व तो चारा व धान्य उंटाना वाटप करण्याचे कामाची जबाबदारी भारतीय जैन संघटनाच्या कार्यकर्तेना दिली. त्या नुसार आज पासुन चारा वाटप करण्यासाठी भारतीय जैन संघटना चे सदस्य करत आहेत.

धान्य खाऊ घालताना आदेश बरडीया, दर्शन देशलहरा, गौरव कोचर, आनंद आचलिया, रोटरी क्लबचे अध्यक्ष व भारतीय जैन संघटनाचे दिनेश लोडाया आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

तसेच अजूनही काही मदत पाहिजे असेल तर अवश्य करू असे आश्वासन पप्पू शेठ बाफना यांनी केले आहे

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम