
भुसावळ ग्रामीण उपविभागात वीजचोरी करणाऱ्यांवर कारवाई
साकरी, फेकरी, कुऱ्हा या ठिकाणी धडक मोहीम
भुसावळ ग्रामीण उपविभागात वीजचोरी करणाऱ्यांवर कारवाई
साकरी, फेकरी, कुऱ्हा या ठिकाणी धडक मोहीम
जळगाव प्रतिनिधी
महावितरणच्या भुसावळ ग्रामिण उपविभागात दि. 13 जानेवारी 2025 रोजी अधीक्षक अभियंता जळगाव मंडळ यांनी नियुक्त केलेल्या वीजचोरी भरारी पथकाने वीजचोरी पकडण्याची मोहीम राबविली.
मोहिमेत साकरी, फेकरी, कुऱ्हा या ठिकाणी धडक मोहीम राबवून 415 वीज जोडण्या तपासण्यात आल्या. त्यात काही ठिकाणी सर्विस वायर टॅपिंग, मीटर बायपास तसेच मीटर मध्ये छेडछाड आढळून आली.
एकूण 57 ग्राहकांच्या वीजचोरी पकडण्यात आले असून त्यांना वीजचोरीची एकूण 17 लाखांची बिले अदा करण्यात आलेली आहेत.सदर विज चोरीचे बिल विहित मुदतीत न भरल्यास त्यांच्याविरुध्द पोलीस स्टेशनला रीतसर एफ आय आर दाखल करण्यात येणार आहे अशी माहिती भुसावळ ग्रामीण उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता प्रशांत इंगळे यांनी दिली. सदर मोहीम यापुढेही भुसावळ ग्रामीण उपविभाग येथे चालूच राहणार आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम