
भूजल पुनर्भरण अभियानाच्या बाराव्या वर्षाला प्रारंभ
भरारी फाउंडेशन व क्रेडाई चा संयुक्त उपक्रम
भूजल पुनर्भरण अभियानाच्या बाराव्या वर्षाला प्रारंभ
भरारी फाउंडेशन व क्रेडाई चा संयुक्त उपक्रम
जळगाव प्रतिनिधी येथील भरारी फाउंडेशन व क्रेडाई जळगांव यांच्या संयुक्त विद्यमाने दि . २८एप्रिल ते २० जून या दोन महिन्याच्या दरम्यान राबविण्यात येणाऱ्या भूजल पुनर्भरण अभियानाला वर्ष १२ वे आज प्रारंभ झाला. दिवसेंदिवस भूजल पातळीची होत असलेली घट, भविष्यात भेडसावणारा पाण्याचा प्रश्न यावर उपाययोजना म्हणून रेन वॉटर हार्वेस्टिंग, पावसाळ्यात छताचे पाणी जमिनीत सोडण्याचे नियोजन याबाबतच्या माहितीचा चित्ररथ शहरात विविध ठिकाणी फिरुन रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम बसविण्याचा संकल्प करण्याचे आवाहन, शहरातील नागरिकांना करण्यात येणार आहे .भूजल पातळी वाढवण्यासाठी पावसाळ्याच्या पाण्याचा विनियोग या विषयावर दोन महिने जनजागृती करणार आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंग, पावसाळ्याच्या पाण्याचा विनियोग या विषयावर लघू चित्रपट स्पर्धा, चित्रकला स्पर्धा,पथनाट्य यांसारखे कार्यक्रम होणार आहेत. रविवारी सायंकाळी काव्यरत्नावली चौकात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात या चित्ररथाला हिरवी झेंडी दाखवून अभियानाचा शुभारंभ झाला. यावेळी आमदार सुरेश भोळे भोळे यांनी शहरातील सर्व मोकळ्या पटांगणात स्पेस मध्ये शोष खड्डे करून त्यांत पावसाचे पाणी जमिनीत मुरावे यासाठी लागणाऱ्या गोष्टींसाठी त्यांच्यातर्फे सर्वोतपरी सहकार्य होईल,असे आश्वासन दिले. तसेच क्रेडाईचे अनिश शहा यांनी आपल्या मनोगतामध्ये सर्व नवीन बांधकामांना भूजल पुनर्भरण यंत्रणा बसविण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करू असे सांगितले. व ज्यांनी या अभियानांतर्गत भूजल पुनर्भरण यंत्रणा बसविल्या ,अशा दहा शहरातील नागरिकांचा जलरत्न सन्मान करण्यात आला. यावेळी आमदार सुरेश भोळे,अनिश शहा, डॉ .पी आर चौधरी ,धनंजय जकातदार ,अनिल कांकरिया रवींद्र लढ्ढा ,दिपक सराफ, आदर्श कोठारी ,चित्रा चौधरी सपन झुनझुनवाला अनिल भोकरे अमर कुकरेजा ,विजय वाणी, सेवानिवृत्त सहायक वनसंरक्षक एस आर पाटील , प्रविण पाटील उपस्थित होते .अक्षय सोनवणे, सागर पगारीया,निर्णय चौधरी सागर परदेशी ,निलेश पाटील रोहिणी मोरडिया यांनी, यशस्वितेसाठी सहकार्य केले. प्रास्ताविक दीपक परदेशी यांनी तर आभार दिपक सराफ यांनी मानले.
यांचा झाला सन्मान
त्यात रवींद्र लढ्ढा नरेंद्र चौधरी लखीचंद जैन जितेंद्र चौहान प्रदीप अहिरराव ,शंतनू चौधरी मनीषा पाटील ,शुभश्री दप्तरी निलेश झोपे रोहिणी देशमुख यांचा सन्मान करण्यात आला.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम