भोरटेक येथे बहिरम महाराज यांच्या यात्रेचे आयोजन

बारा गाड्या ओढण्याच्या कार्यक्रमाला भाविकांची गर्दी

बातमी शेअर करा...

भोरटेक येथे बहिरम महाराज यांच्या यात्रेचे आयोजन
बारा गाड्या ओढण्याच्या कार्यक्रमाला भाविकांची गर्दी

कजगांव ता. भडगांव I वार्ताहर

येथुन जवळच असलेल्या भोरटेक ता. पाचोरा येथे बहिरम महाराज यांच्या यात्रेचे आयोजन दरवर्षी सर्व भोरटेक् ग्रामस्थ मिळून करतात दरवर्षा प्रमाणे या वर्षी देखील दिनांक २० रोजी ही यात्रा आयोजित करण्यात आली होती यावेळी येथील विमलबाई नाईक भक्तिनबाई यांनी बारा गाडया ओढल्या बारा गाड्या व यात्रोत्सव कजगांव सह परिसरात प्रसिध्द आहे

दरवर्षी बहिरम महाराज यांच्या यात्रेचे आयोजन करण्यात येत असते यात महिला भक्तीन बारा गाड्या ओढत असते अशी येथील जुनी रूढी परंपरा आहे ती आज देखील तेवढ्याच श्रद्धेने पाळली जाते बारागाड्या वर येथील व परिसरातील लोक बसण्यासाठी गर्दी करत बसतात या गाड्यावर ज्या व्यक्तीच्या शरीरावर काळा दोरा व पायात चप्पल नसेल तीच व्यक्ती या गाड्यावर बसते अशी एक परंपरा कायम आहे बारा गाड्या व यात्रोत्सवात परिसरातील हजारो नागरिक सहभागी होत असतात

येथील यात्रेत विशेष करुण जे तरुण व येथील मूळ ग्रामस्थ नोकरी निमित्त व व्यवसाय निमित्त बाहेर गावी आहेत ते या यात्रोत्सव व बारा गाड्या साठी आवर्जून सह परिवार उपस्थित असतात त्यामुळे येथील रहिवासी असलेले व बाहेरगावि असलेले व्यक्ति ही यात्रा पाहण्यासाठी असंख्य कामे सोडून येतात त्यामुळे त्यांच्या साठी येथील यात्रेला फार मोठे महत्व असते यावेळी यात्रा उत्सवानिमित्त माजी परिवहन अधिकारी अनंतराव पाटील,सुरेश स्वार, सरपंच गुलाब जाधव,उपसरपंच श्रावण पाटील,ग्रामसेवक समाधान पवार,पोलिस पाटील श्रीकांत पाटिल, माजी सरपंच रावसाहेब पाटिल,शफी मणियार,उज्वल पाटील,दिनेश पाटील ,बिहारी पाटील,परमेश्वर पाटील,सुरेश पाटील,विनायक पाटील,गुलाब पाटील,प्रकाश पाटील,ईश्वर पाटील,दयाराम पाटील,भीमराव पाटील,शिवाजी पाटील, तसेच भोरटेक व कजगाव परिसरातिल विविध क्षेत्रांतील मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते

 

 

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम