
मंगळग्रह मंदिर परिसरात मोफत आरोग्य तपासणी शिबीरात शेकडो गरजूंनी घेतला लाभ
मंगळग्रह सेवा संस्था, व्हॉईस ऑफ मीडिया आणि राष्ट्रीय बहुउद्देशीय मंडळाचा स्तुत्य उपक्रम
मंगळग्रह मंदिर परिसरात मोफत आरोग्य तपासणी शिबीरात शेकडो गरजूंनी घेतला लाभ
मंगळग्रह सेवा संस्था, व्हॉईस ऑफ मीडिया आणि राष्ट्रीय बहुउद्देशीय मंडळाचा स्तुत्य उपक्रम
अमळनेर प्रतिनिधी
धार्मिकतेसोबतच सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असलेल्या मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे गुडघा व खांदा यांचे आजार असणाऱ्या रुग्णांसाठी २ रोजी मोफत तपासणी व मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरात खानदेशातील शेकडो गरुजूंनी लाभ घेतला.
मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांच्या मार्गदर्शनाने मंगळग्रह मंदिर परिसरात आयोजित या शिबीरात धुळे येथील ऑर्थेास्कोपी व कृत्रीम सांधेरोपण तज्ञ डॉ. पियुष सुरेश वसईकर यांनी रुग्णांची मोफत तपासणी करुन मार्गदर्शन केले. त्यांना चेतन चौधरी, जनसंपर्क अधिकारी अरुण गुरव व मास्टर प्रसाद यांचे सहकार्य लाभले. या शिबिरात अमळनेरसह पारोळा, रावेर, नंदुरबार, शिरपूर, बेटावद आदी भागातील गरजूंनी लाभ घेतला.
यशस्वीतेसाठी व्हॉईस ऑफ मीडिया आणि राष्ट्रीय बहुउद्देशीय मंडळासह मंगळग्रह सेवा संस्थेचे सचिव सुरेश बाविस्कर, विश्वस्त अनिल अहिरराव, जनसंपर्क अधिकारी रवींद्र मोरे, मंगल सेवेकरी पुषंद ढाके, योगेश पाटील, निखिल सूर्यवंशी, हरिष चौधरी, राजेंद्र पाटील यांचे अनमोल सहकार्य लाभले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम